शरीरासाठी अतिशय घातक आहे साबुदाणा; उपवास, व्रत-वैकल्यांसाठी वापरण्याआधी जाणून घ्या गुणधर्म
साबुदाणा (संग्रहित-संपादित प्रतिमा)

श्रावण म्हणजे येणाऱ्या सणांची नांदी असते. या काळात हिंदू धर्मासह इतरही धर्मांत अनेक सण-उत्सव, व्रत वैकल्ये केली जातात, उपवास ठेवले जातात. यामध्ये एक समान गोष्ट असती ती म्हणजे उपवासाचे पदार्थ. उपवासादरम्यान जवळजवळ सर्व घरांत हमखास वापरण्यात येणारा पदार्थ म्हणजे साबुदाणा. तसाही साबुदाणा पूर्ण वर्षांत विविध कारणांनी वापरला जातो, अनेक ठिकाणी साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे हे नाश्त्याचा पदार्थ म्हणून त्याला पसंती दिली जाते. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणारा साबुदाणा आपल्या शरीरासाठी लाभदायक आहे का? याचा कधी विचार केला आहे?

तर उपवास, व्रत वैकल्यासाठी वापरला जाणारा साबुदाणा शरीरासाठी आहे अतिशय घातक, तुम्हीच पहा कारणे –

  • साबुदाणाचा जन्म हा इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स या देशात झाला. साबुदाणा हा सागो झाडांपासून कृत्रिमरीत्या तयार केला जातो. यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण अतिशय जास्त आहे त्यामुळे वजन वाढण्यासाठी हा कारणीभूत ठरू शकतो.
  • 100 ग्रॅम साबुदाण्यामध्ये मध्ये 94 ग्रॅम कर्बोदके, 0.2 ग्रॅम प्रथिने, 0.5 ग्रॅम तंतुमय घटक व फक्त 10 ग्रॅम कॅल्शिअम असते. यावरून लक्षात येते की शरीरासाठी (वजन वाढवण्याखेरीज) तसा या पदार्थाचा काहीच उपयोग नाही.
  • साबुदाण्यापासून पदार्थ बनवण्यासाठी त्यात जे पदार्थ वापरले जातात त्यामध्ये बटाटा, शेंगदाणे कुट व इतर काही घटकांचा समावेश असतो. हे घटक पचायला अतिशय जड असतात यामुळे पित्त वाढणे, पोट फुगने, पोट दुखणे, भुक मंदावने अशा समस्या उद्भवतात.
  • साबुदाणा आतड्यातील सर्व द्राव शोषून घेत असल्याने आपली मलप्रवृती सुद्धा कठीण होते. तसेच साबुदाण्यामुळे पित्ताचा त्रासही वाढतो. (हेही वाचा: Ganesh Chaturthi 2019 Special Ukdiche Modak: गणपती बाप्पाचा आवडीचा नैवेद्य उकडीचे मोदक घरच्या घरी झटपट कसे बनवाल? (Watch Video))

अशाप्रकारे ज्यादिवशी हलका आणि प्रमाणात आहार घ्यायचा त्याच दिवशी, म्हणजे उपवासाच्या दिवशी आपण साबुदाणासारखा जड पदार्थ खाऊन स्वतःच्या शरीराचे नुकसान करून घेत आहोत. त्यामुळे वेळीच सावध व्हा व साबुदाण्याचा जितका हवा तितकाच वापर करा.

(सूचना : या लेखाचा उद्देश हा माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे)