Ukdiche Modak Recipe: गणपती बाप्पाचं आगमनाची घरात जशी मखर, डेकोरेशन, फुलांचा हार, प्रसाद यांच्यासाठी तयारी केली जाते. तशीच गृहिणींची बाप्पाच्या नैवेद्यामध्ये उकडीचे मोदक बनवण्यासाठी लगबग सुरू असते. बाप्पाच्या नैवेद्यामध्ये आणि शिदोरीमध्ये हमखास उकडीच्या मोदकांचा समावेश असतो. पण उकडीचे मोदक बनवण्यासाठी गृहीणींच्या पाककौशल्याची कसोटी लागते. तांदळाची उकड, खोबरं - गूळाचं सारण आणि कळीदार मोदक हाताने साच्याचा वापर न करता बनवणं हे मोठं आव्हान असतं. पण यंदा तुम्ही बाप्पाला प्रसन्न करून घेण्यासाठी विकतच्या मोदकांऐवजी घरगुती मोदकांचा प्रसाद दाखवणार असाल तर पहा घरच्या घरी उकडीचे मोदक कशाप्रकारे बनवाल?
सध्या सोशल मीडियामध्ये उकडीचे मोदक बनवण्याचा साध्या सोप्या ट्रिक्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यापैकी काही ट्रिक्सचावापर करून तुम्ही नक्कीच बाप्पाला मोदकांचा प्रसाद दाखवण्यासाठी मऊसुत उकडीचे मोदक बनवू शकता. Ganeshotsav 2019: उकडीचे ते Nutella बॉम्ब मोदक; बाप्पाच्या आवडीच्या मोदकांचे हटके व्हर्जन चाखण्यासाठी मुंबईतील या पाच ठिकाणांना नक्की द्या भेट!
उकडीच्या मोदकाची रेसिपी
उकडीचे मोदक बनवण्याच्या खास टीप्स आणि ट्रिक्स
उकडीचे मोदक हे बाप्पाच्या नैवैद्यातील पंचपक्वान्नाच्या ताटातील एक पदार्थ असला तरीही यासाठी बाप्पांइतकाच घरातील आबालवृद्धदेखील उत्सुक असतो. गणेश चतुर्थी दिवशी हमखास घरातील सारीच मंडळी गरमागरम उकडीच्या मोदकांवर ताव मारतात. मोदक फोडून त्यावर साजूक तूप घालून मोदक खाण्याची मज्जा काही औरच असते.