Raisins (Photo Credits: PixaBay)

सुका मेवा म्हणजेच ड्रायफ्रूट्स हा असा पदार्थ आहे जो अनेकांच्या डब्यात आपल्याला पाहायला मिळतो. प्रवासावेळी, कोणतेही काम करत असताना अनेकांना सुका मेवा खाण्याची सवय असते. त्यात काजू, पिस्ता, बदाम हे ड्रायफ्रूट्स तर आपण आवडीने खातो तसेच ते शरीरासाठी उपयुक्तही असतात. या सुका मेव्यामध्ये आणखी एक पदार्थ आहे जो शरीरासाठी उपयुक्त तर आहेच शिवाय अनेक आजारांवर गुणकारी देखील आहे. तो म्हणजे 'मनुका'(Raisins). मनुके हे चवीने गोड असल्यामुळे काहींना ते आवडत नाही. मात्र मनुक्यामध्ये उपयुक्त अशी पोषकतत्वे आहेत जी शरीरासाठी फायदेशीर आहेत.

आकाराने छोटा दिसणारा हा मनुक्याचे फायदे ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. मनुका हा प्रकार कोणत्याही गोड पदार्थात टाकल्यास त्याची चव आणखी वाढते. अशा या चवदार मनुक्याचे फायदे ही तितकेच गुणकारी आहेत.

या आजारांवर गुणकारी ठरतील मनुके:

1. लठ्ठपणा: जर तुमचे वजन कमी होत नसेल तर तुम्हाला मनुके खाणे फायदेशीर ठरेल. मनुक्यांमध्ये नैसर्गिक साखर असते, जी शरीरात अगदी सहजरितया पचते. त्यामुळे तुम्हाला अतिरिक्त साखरेची गरज पडत नाही. त्यामुळे तुमचे आपोआप कमी व्हायला लागते.

हेदेखील वाचा-Dry Fruit खा, शरीरातील रक्ताचे कमी प्रमाण संतुलित राखा

2. बद्धकोष्ठता: बरेचसे लोक बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधे घेतात. पण इतकी ढीगभर औषधांपेक्षा रोज मनुके खाल्ल्यास तुमची ही समस्या दूर होण्यास मदत होईल.

3. हाडं ठिसूळ होणे: दररोज मनुके खाल्ल्याने हाडं मजबूत होण्यास मदत होते. मनुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. यामुळे दररोज मूठभर मनुके तरी खाल्ली पाहिजेत.

4. अशक्तपणा कमी होणे: मनुकांमध्ये नैसर्गिक साखर असल्यामुळे ती सहजरित्या पचते. यामुळे शरीरात लवकर ऊर्जा निर्माण होते. याशिवाय मनुकांमध्ये कोलेस्ट्रॉल नसतं, त्यामुळे हृदयविकाराच्या रुग्णांसाठीही हे फायदेशीर आहे.

मनुके चवीने जरी गोड असले तरी ते नैसर्गिक गोड असल्या कारणाने त्याचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. शरीरात साखरेचे प्रमाण वाढेल असे कित्येकांना वाटत असेल तर त्यांनी चिंता करु नये. मनसोक्तपणे मनुक्यांचा आस्वाद घ्यावा.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)