Dry Fruit खा, शरीरातील रक्ताचे कमी प्रमाण संतुलित राखा
सुकामेवा (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

शरीरातील रक्तामध्ये पेशींची संख्या कमी होणे हे शरीरीसाठी अपायकारक ठरु शकते. तसेच डेंगू(Dengue), मलेरिया (Maleria) आणि टायफॉईड (Typhoid) यांसारख्या तापाच्या आजारांमध्ये शरीरातील पेशी कमी होतात. त्यामुळे डॉक्टरांकडून शरीतील पेराशी वाढविण्यासाठी काय करावे याबद्दल सल्ला दिला जातो. तसेच सुकामेवा (Dry Fruit) सुद्धा रक्त प्रक्रियेचा घटक असून तो सुद्धा शरीरातील पेशींची संख्या वाढविण्यास मदत करतो. म्हणूनच दररोज 5 प्रकारच्या सुकामेव्याचे सेवने करणे अगदी उत्तम मानले जाते.

1. शरीरातील पेशींची(Body Platelets) संख्या किती हवी?

शरीरातील पेशींची संख्या कमी होण्याच्या स्थितीला थ्रोम्बोसाइटोपीनिया (Thrombocytopenia) असे म्हटले जाते. व्यक्तीच्या शरीरामध्ये पेशींची संख्या ही 1,50,000 ते 4,50,000 लाख प्रति मायक्रोलीटर एवढी असणे आवश्यक आहे. तर व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा आजार झाल्यास त्याच्या शरीरातील पेशींची संख्या कमी होण्याची शक्यता असते.

2. सुकामेव्याचा आरोग्याला फायदा

सुकामेव्यामध्ये लोहचे (Iron) प्रमाण खूप आढळून येते. त्यामुळे सुकामेव्याचे सेवन केल्यास शरीराती पेशी वाढण्यास मदत होऊन मजबूत होतात. या सुक्या फळांचा उपयोग तुम्ही भाजी, आईस्क्रिम, फ्रूट सलाड या पदार्थांसाठी करु शकता. तसेच ग्लूकोज (Glucose) आणि फॅक्ट्रोज असे घटक असल्याने थकवा निघून जातो.

3. शरीरातील रक्ताच्या कमतरतेपासून दूर राहण्यास मदत

सुकामेव्याच्या पाण्यामध्ये लोह, कॉपर आणि बी-कॉम्प्लेक्स हे घटक भरपूर प्रमाणातच असतात. त्यामुळे रक्तातील लाल पेशी उत्तम राहण्यास मदत होते. तर शरीरात नवीन रक्त तयार होण्याच्या प्रक्रियेत सुकामेवा खाणे खुप फायदेशीर ठरते.

4. डोळ्यांसाठी उत्तम

सुकामेव्यामध्ये विटामिन ए, ए-बीटा कॅरेटीन आणि ए-कॅरोटीनॉईड हे घटक असतात. त्यामुळे डोळ्यांसाठी उपयुक्त असलेल्या घटकांची पुर्तता या सुकामेव्याच्या सेवनाने पूर्ण केली जाते. तसेच वाढत्या वयोमानानुसार डोळ्यात मोतिबिंदू, डोळ्यांना अंधूक दिसणे या समस्या कमी होतात.

5. सुकामेव्यातील पोषक घटक

100 ग्रॅम सुकामेव्यातून तुम्हाला भरपूर प्रमाणात पोषक घटक मिळू शकतात.

सॅच्युरेटेड फॅट- 0.1 ग्रॅम

अनसॅच्युरेटेड फॅट - 0 ग्रॅम

मोनोसॅच्युरेटेड फॅट - 0.1 ग्रॅम

कोलेस्ट्रॉल - 0 मिलीग्रॅम

सोडियम- 11 मिलीग्रॅम

पोटॅशियम - 749 ग्रॅम

कार्बोहायड्रेट- 79 ग्रॅम

साखर- 59 ग्रॅम

प्रोटीन - 3.1 ग्रॅम

डायट्री फायबर - 3.7 ग्रॅम

कॅलरी- 299