Multisystem Inflammatory Syndrome म्हणजे काय? जाणून घ्या कोविड 19 च्या लहान मुलांमधील संसर्गानंतर जडणार्‍या या दुर्मिळ आजाराबद्दल!
COVID in KIDs| PC: Pixabay.com

कोरोना वायरस (Coronavirus) संसर्गामध्ये अनेकांना या वायरस वर मात केल्यानंतरही काही त्रास जाणवत आहेत. लहान मुलांमध्येही कोरोना वायरस संसर्गानंतर काही दुष्परिणाम, पोस्ट कोविड इंफेक्शन (Post COVID Infection) अनुभवायला येत आहेत. यापैकी एक म्हणजे मल्टी सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोम (Multisystem Inflammatory Syndrome - Children)(MIS-C).या आजारात अनेक अवयवांवर परिणाम होत आहेत. लहान मुलांच्या हृद्य, किडनी, लिव्हर (यकृत) यावर परिणाम होत असल्याचं पहायला मिळालं आहे.

लहान मुलांमध्ये Multisystem Inflammatory Syndrome (MIS-C) ची अनेक लक्षणं बघायला मिळाली आहेत. मायो क्लिनिकच्या आर्टिकल नुसार, लहान मुलांना Multisystem Inflammatory Syndrome चा त्रास होत असल्यास त्यांना ताप, डायरिया, उलट्या, पोटदुखी, त्वचेवर चट्टे, हार्टबीट वाढणं,डोळे लाल होणं, ओठ सुजणं, जीभ, हात, पाय सुजणं, लाल होणं, डोकेदुखी ही लक्षणं दिसत आहे. पोस्ट कोविड हा त्रास भारतीय मुलांमध्ये अधिक जाणवत आहे. नक्की वाचा: COVID-19 New Symptoms: तीव्र डोकेदुखी, ऐकण्याची समस्या यांसह 'ही' आहेत कोविड-19 ची नवी लक्षणे.

MIB ट्वीट 

Indian Academy of Pediatrics कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या सुरूवातीला अंदाजे कोविड 19 ची लक्षणं असलेल्यांना किंवा नसलेल्यांना 2-6 आठवड्यांनंतर Multisystem Inflammatory Syndrome चा त्रास जाणवत होता. साधारण एक लाखात 12 रूग्ण समोर येत होते. या आजाराचं वेळीच निदान झाल्यास त्यावर चांगल्याप्रकारे मात करणं शक्य आहे.

काही मुलांमध्ये कोरोनाची लागण झाल्यानंतर Multisystem Inflammatory Syndrome चा त्रास हा गंभीर स्वरूपाचा होऊ शकतो. यासाठी आयसीयू ट्रीटमेंटची देखील गरज भासू शकते. हा आजार एकातून दुसर्‍याकडे प्रसारित होण्यासारखा नाही.

भारतामध्ये विविध राज्यांत मुलांना Multisystem Inflammatory Syndrome चा त्रास झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. मागील सहा महिन्यात केरळ मध्ये ऑगस्ट महिन्याच्या शेवटापर्यंत 300 रूग्ण होते. तामिळनाडूमध्ये 14 तर कर्नाटकात 29 रूग्ण आहेत.