तोंडातून दुर्गंधी येणे (Mouth Odor) हे समस्या अनेकांमध्ये असते. याला मूळ कारण म्हणजे वेळी-अवेळी खाणे किंवा काही खाल्ल्यानंतर चूळ न भरणे यांसारखी मुख्य कारणे आहेत. सध्याच्या लाईफ जितकी फास्ट झालीय तितकीच ती काही जणांसाठी रेंगाळलेली झाली असते. अशावेळी सकाळी उठल्यावर तोंड न धुणे, आवश्यक तितके पाणी न पिणे ही मुख्य कारणे आहेत. तोंडातून दुर्गंधी येणे या समस्येकडे अनेकजण सर्रासपणे दुर्लक्ष करतात. मात्र यामुळे तुमचा चार-चौघांत अपमान देखील होऊ शकतो. किंवा काही जण तुमच्याशी बोलणे देखील टाळू शकता.
आपले व्यक्तिमत्त्व कसे सुधारायचे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. त्यात तोंडाला दुर्गंधी येणे ही समस्या तुमच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करु शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्ही असे सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याने तुमची ही समस्या दूर होईल, पाहा कोणते आहेत हे 10 उपाय:
1. तुम्ही जर घराबाहेर असल्यास तुम्हाला ब्रश करणे शक्य नसते अशावेळी बडीशेप खाल्ल्याने तोंडाला येत असलेली दुर्गंधी कमी होऊ शकते. त्यामुळे नेहमी तुमच्या जवळ बडीशेप ठेवा.
2. तसेच तुम्ही पुदिन्याची 2-3 पाने खावीत
3. शक्य असल्यास वेलची चा दाणा चघळल्यास तोंडाला येणारी दुर्गंधी त्वरित निघेल.
4. एखादी लवंग तोंडात ठेवल्यानेही तोंडाची दुर्गंधी कमी होते.
5. पार्सलीमध्ये जीवाणूंचा नाश करणारे क्लोरोफिल असल्यामुळे जेवणानंतर पार्सली खावे. हे सर्वात उत्तम माउथ फ्रेशनर आहे.
6. दालचिनीच्या काड्या तुम्ही चावू शकता किंवा चहात टाकून पिऊ शकता.
7. कोथिंबीरची 4-5 पाने किंवा धणे खाल्ल्याने देखील तोंडाची दुर्गंधी कमी होते.
8. भरपूर पाणी प्यावे
9. शक्य असल्यास दह्याचे सेवन केल्यानेही तोंडाची दुर्गंधी दूर होते
10. संत्री खाल्ल्याने देखील तोंडाला येणारा उग्र वास कमी होतो.
हेही वाचा- सातत्याने तोंड येत आहे, करा हे घराच्या घरी उपाय
हे सर्व उपाय सांगण्याचा उद्देश एकच की, तुमचे लोकांमध्ये हसे होऊ नये किंवा तुम्हाला अपमानास्पद वाटू नये यासाठी तुम्हाला तोंडाला दुर्गंधी येण्याच्या समस्येपासून स्वत:ला दूर ठेवणे गरजेचे आहे. तुमचे व्यक्तिमत्व आणि तुम्ही स्वत:ला लोकांसमोर कसे सादर करता यावर तुमची ओळख अवलंबून असते. त्यामुळे अशा छोट्या मोठ्या समस्येकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये.)