सातत्याने तोंड येत आहे, करा हे घराच्या घरी उपाय
तोंड येणे (फोटो सौजन्य - फेसबुक)

तोंड येणे ही सामान्य बाब वाटत असली तरी यामागे अनेक कारणे आहेत. त्यामुळे ज्यांना पोटाशी संबंधित समस्या असतात अशा व्यक्तींना वरचेवर तोंड येत असते.तर काही जणांना खाण्यापिण्याच्या सवयीत बदल झाल्यामुळे अॅलर्जी  झाल्याने तोंड येते. तर तोंड येण्यापासून दूर राहण्यासाठी करा हे  घरच्या घरी उपाय

--तूरटीमध्ये अँटीबायोटीक्स असल्याने ती अल्सरवर लावल्यास खूप भाजतं. पण वेदना कमी होण्यास मदत होते.

-तोंड येण्यावर तुळशीची पाने खाणे उपयोगी ठरते. तुळशीच्या पानात अँटीबायोटीक्स  असल्याने त्याचा रस तोंडातील लाळेत मिसळतो. त्यामुळे तोंडातील अल्सर बरा होतो.

-तोंड आले असेल तर आतील बाजूस तूप लावले तर ते ग्लिसरीनचं कामं करत. तसेच रोज रात्री एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे तूप टाकून घेतल्याने आराम मिळतो.

-मधातील अँटीबायोटीक्समुळे पाचन शक्ती तर सुधारण्यास मदत होते. तसेच अल्सर वर जरी मध लावले तरी आराम मिळतो. अल्सरवर मध लावल्यावर तोंडात खूप लाळ येते. पण याच लाळेतून अल्सर बरा होतो.

-तोंड आल्यावर २ ते ३ लसणाच्या पाकळ्यांची पेस्ट करा. ही पेस्ट अल्सरवर लावा. थोड्यावेळाने थंड पाण्याच्या गुळण्या करा.