Flies (PC - Pixabay)

Monsoon Home Care Tips: पावसाळा आला की, मोठ्या प्रमाणात रोगराई वाढते. पावसाळ्यात डास, माशा विविध आजारांना आमंत्रण देतात. पावसाळ्याच्या दिवसांत घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर माशा होतात. या माशा बाहेरून घरात रोगजंतू घेऊन येतात. याच माशा अन्नावर बसल्या की, आपल्याला विविध आजारांना सामोरं जावं लागतं. माशांमुळे डिसेंट्री, टायफाईड, कॉलरा आणि गॅस्ट्रोइंट्रीटीस सारखे आजार उद्धभवतात. पावसाळ्यात घरात होणाऱ्या माशांपासून कशी सुटका करायची यासंदर्भात काही खास टिप्स या लेखातून जाणून घेऊयात.

पावसाळा आला की, मन प्रसन्न होतं. मात्र, पावसाच्या पाण्यामुळे घराभोवती चीड-चीड होते. तसेच घरामध्ये माशा आणि डासांचे प्रमाण वाढते. घरात माशांचे प्रमाण वाढल्याने आपल्याला वारंवार कामात अडथळा येतो. त्यामुळे माशांचा नायनाट करण्यासाठी तुम्ही खालील टिप्स वापरू शकता. (हेही वाचा - अरेंज मॅरेज करताय? मग जोडीदाराला 'हे' 5 प्रश्न नक्की विचारा)

कापूर -

साधारणत: सर्वच घरात कापूर आढळतो. धूपसोबत कापूर जाळल्यास माशा कमी होतात. याशिवाय घरात चारही कोपर्‍यात कापराच्या गोळ्या टाका. माश्या खूप असतील तर कापूर जाळा. कापराच्या वासाने माशा कमी होण्यास मदत होते.

तुळस -

प्रत्येक घरात तुळस आढळते. तुळशीमधील औषधी गुणधर्मामध्ये कीटकांना दूर ठेवण्याची क्षमता असते. घरात तुळशीचे रोप लावल्यास माश्यांचा वावर कमी होतो. (वाचा - बाबा रामदेव यांच्या पतंजली ने कोरोना व्हायरस औषधासंदर्भात केला मोठा दावा; गुळवेल, अश्वगंधा ने कोविड-19 वर होऊ शकतो उपचार)

घरात स्वच्छता ठेवा -

घरात माशा होत असतील तर, घरामध्ये स्वच्छता ठेवा. घरातील किचन सतत स्वच्छ करत रहा. उघड्यावर खाण्याच्या वस्तू ठेवू नका. ब्लिच बेस्ड किंवा क्लोरिन बेस्ड क्लिनर्सने ओटा स्वच्छ ठेवा. घरात अन्न सांडवू नका. बंद झाकणाची कचरा कुंडी वापरा. कचरा जास्त वेळ घरात ठेऊ नका.

घरात सेक्ट रेपेलंट स्प्रे मारा -

घरात किटकांचा वावर कमी करण्यासाठी इंसेक्ट रेपेलंट स्प्रे मारा. मात्र, त्याचा वापर करताना घरातील लहान मुलं तसेच खाण्याचे पदार्थ दूर ठेवा. बाजारात आणखीही काही केमिकल्स मिळतात ते देखील तुम्ही वापरू शकता.

दारं खिडक्या बंद करा -

पावसाळ्यात घराच्या खिडक्या किंवा दारं बंद ठेवा. खिडक्यांना जाळी किंवा मच्छरदाणी लावा. असं केल्यास डास तसेच माशा घरात येणार नाहीत. वरील सर्व टीप्स तुमच्या घरातील माशा दूर करण्यास नक्की मदत करतील.