प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. हिंदू धर्मात लग्न हा 16 वा संस्कार समजला जातो. यातील अनेक जण अरेंज मॅरेज (Arranged Marriage) तर काही जण लव्ह मॅरेजचा (Love Marriage) पर्याय निवडतात. लव्ह मॅरेज करणाऱ्या जोडप्यांना एकांतात एकमेकांना काही प्रश्न विचारण्याची तसेच एकमेकांना जाणून घ्यायची गरज पडत नाही. मात्र, अरेंज मॅरेज करणाऱ्या जोडप्यांना एकमेकांना जाणून घेण्यासाठी काही प्रश्न विचारणं गरजेचं असतं.

आपला होणारा जोडीदार भविष्याविषयी काय विचार करतो? त्याचं ध्येय काय? त्याला कोणत्या गोष्टी आवडतात? आदी संदर्भात आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं. त्यामुळे यंदा तुम्हीदेखील अरेंज मॅरेज करण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुम्हाला नक्की उपयोगात येईल. (हेही वाचा -ऐकावं ते नवलंच! चीन मधील व्यक्तीच्या Bum मधून आत शिरला मासा, बाहेर काढण्यासाठी करावी लागली सर्जरी (Watch Video))

अशी करा प्रश्नाची सुरुवात -

प्रथम भेटीत मुलगा आणि मुलगी एकमेकांना ओळखत नसतात. त्यामुळे मुलाला उलट-सुलट प्रश्न न विचारता सर्वप्रथम त्याला त्याच नाव विचारा. त्यानंतर एकमेकांच्या आवडी-निवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. मुलाला तुमच्यासोबत जास्त कम्फर्ट वाटण्यासाठी आधी तुम्ही स्वतःविषयी सांगण्यास सुरुवात करा.

करिअर विषयी प्रश्न विचारा -

आपल्या जोडीदाराला करिअर विषयी काही प्रश्न विचारा. त्याला प्रश्न विचारल्यानंतर स्वत: च्या करिअर संदर्भातील अपेक्षाही त्याला सांगा. आपल्या जोडीदाराच्या इच्छा आकांक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

नोकरीसाठी परदेशात जाणार का?

अनेकदा करिअर निमित्ताने मुले भारत सोडून परदेशात जातात. परंतु, त्यावेळी त्यांची पत्नी देश सोडून जाण्यास तयार नसते. त्यामुळे अनेकदा या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण होतात. म्हणून लग्नाआधीचं या गोष्टी स्पष्ट होणं गरजेचं असतं. (हेही वाचा - Super Vaccine: मच्छरांच्या थुंकीपासून तयार होणार 'सुपर लस'; डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, जीका आदी आजारांचा होणार खात्मा - संशोधन)

दोन्ही परिवार सांभाळण्यासाठी तुम्ही तयार आहात का?

लग्न झाल्यानंतर दोन परिवार एकत्र येतात. त्यामुळे नवऱ्या मुलावर दोन कुटुंबातील व्यक्तींची जबाबदारी येते. मुलगी आपल्या आई-वडिलांना सोडून सासरी येत असते. त्यामुळे तिच्या आई-वडिलांना आयुष्यभर आधार देण्याची तयारी मुलामध्ये आहे का? हे पाहणं आवश्यक असतं.

विवाहाच्या अपेक्षा -

प्रत्येक मुलीने आपल्या होणाऱ्या जोडीदाराला लग्नाबद्दल काय अपेक्षा आहेत? हे जाणून घ्यावं. यावेळी तुम्हीदेखील आपल्या अपेक्षा नवऱ्या मुलाला सांगू शकता. लग्नामधील सर्व कार्यक्रमांविषयीदेखील यावेळी बोलून घ्या.