चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus) ने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाखाहून अधिक झाली आहे. कोरोनामुळे हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या महामारीवरील लस शोधून काढण्यासाठी भारतासह संपूर्ण जग प्रयत्न करत आहे. काहींनी कोरोनाची लस अस्तित्वात येण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागेल, असा दावा केला आहे. परंतु, योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या पतंजली (Patanjali) ने कोरोनावरील लसीसंदर्भात मोठा दावा केला आहे.
बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे की, कोरोना व्हायरसवर गुळवेळ (Giloy) आणि अश्वगंधा (Ashwagandha) 100 टक्के परिणामकारक ठरू शकते. या दोन्हीच्या सेवनाने कोरोनावर उपचार केला जाऊ शकतो. आयुर्वेदामध्ये प्रत्येक रोगावर उपचार करण्याची ताकत असते, असंही रामदेव बाबांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - गुजरातमध्ये गेल्या 24 तासांत 38 जणांचा मृत्यू; तर 513 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह ; 11 जून 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)
प्राप्त माहितीनुसार, कोरोना रुग्णावरील उपचारासाठी आयुष मंत्रालय 6 आयुर्वेदिक औषधांवर संशोधन करत आहे. यात अश्वगंधावर दोन प्रकारचे संशोधन सुरू आहे. याचप्रमाणे गुळवेल, मुलेठी, आयुष-64 आणि पिपरीवर रिसर्च सुरू आहे. गुळवेल, आवळा आणि अश्वगंधामुळे इम्यूनिटी वाढते. या आयुर्वेदिक औषधांच्या गोळ्या सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.
दरम्यान, भारतातकोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी हाती आलेल्या आकडेवारीनुसार, देशात 9996 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. तर 357 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशात कोरोना बाधितांचा आकडा 286579 वर पोहोचला आहे. यातील 137448 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तसेच 141029 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.