गोव्यात एकूण 417 कोरोनाबाधित; दिवसभरात आढळले आणखी 30 रुग्ण; 11 जून 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Jun 12, 2020 12:00 AM IST
देशात कोरोना बाधितांचा वाढता आकडा पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 276583 झाली असून मृतांचा आकडा 7745 वर पोहचला आहे. कोविड-19 ग्रस्तांचा वाढता आकडा चिंता वाढवणारा असला तरी त्यातून रिकव्हर होणाऱ्यांची संख्या देखील चांगली आहे. त्यामुळे भारताचा रिकव्हरी रेट 48.88% इतका आहे.
तर महाराष्ट्राभोवती कोविड-19 ने घातलेला वेढा दिवसेंदिवस मजबूत होत असून राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 94 हजारांवर पोहचला आहे. तर 3 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मुंबई शहराला कोरोना व्हायरसचा अधिक फटका बसला असला तरी मृत्यू दर कमी झाला असून डबलिंग रेट 24.5 दिवसांवर आला आहे. तर डिस्चार्ज रेट 44% इतका असल्याची दिलासादायक माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान अजूनही संकट टळलेलं नाही. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेली शिथीलता जीवघेणी होत असल्यास पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात येईल, असा गंभीर इशारा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेला दिला आहे.