पाऊस (Monsoon) सुरु झाला की वातावरणात गारवा निर्माण होतो. अशा वेळी चहाप्रेमींना (Tea Lovers) वारंवार तलप येते येत गरमागरम चहा पिण्याची. पावसामध्ये गरमागरम भजी आणि वाफळता चहा प्यावा अशी अनेकांना इच्छा होते. इतकच काय तर चहाची फारशी आवड नसलेले देखील पावसाळ्याचा चहाचा आस्वाद घेतात. मात्र पावसाळ्यात नुसता चहा न बनवता त्यात काही गुणकारी आणि औषधी गोष्टी टाकल्यास तुम्ही साथीच्या आजारापासून दूर राहाल. तसेच चहा प्यायल्यामुळे शरीराला काही त्रासही होणार नाही.
पावसाळ्यात सर्दी-खोकला यासांरखे साथीचे होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी साखरेऐवजी गुळाचा चहा प्यायल्यास सर्दी, खोकला यांसारख्या आजारांपासून आपण दूर राहतो. गूळ गरम असल्यामुळे पावसाळ्यात शरीरात उष्णता निर्माण करण्यास मदत होते. पावसाळ्यात कोरा चहा पिणे हे शरीरास फायदेशीर आहे. यामुळे वजन संतुलित राहते. ही आहे ग्रीन टी पिण्याची योग्य पद्धत आणि योग्य वेळ, जाणून घ्या सविस्तर
पावसाळ्यात चहा बनवताना कोणती काळजी घ्यावी
1. पावसाळ्यात चहा मध्ये आलं किसून टाकल्याने शरीरात उष्णता निर्माण होण्यास मदत होते. ज्यामुळे तुम्ही सर्दी, कफ यांसारख्या आजारांपासून दूर राहतात.
2. आलं आणि तुळशीची पाने चहामध्ये वापरून असा चहा प्यायल्याने शरीराला आराम मिळतो. तसचे तुमची पचनक्रिया सुधारते.
3. पावसाळ्यात गवती चहा पिणे देखील शरीरास गुणकारी आहे. गवती चहा मधील औषधी गुणांना ताप, सर्दी, खोकला यांसारख्या आजारांपासून आराम मिळतो. थकवा, डोकेदुखीचा त्रास देखील कमी होतो.
4. चहामध्ये इन्सुलिन सेन्सिव्हिटी वाढविण्यासाठी काळी मिरी वा दालचिनी घातलेला चहा देखील फायदेशीर ठरतो.
5. पावसाळ्यात तुम्ही वेलची आणि जायफळ यांची पावडर करून ती चहामध्ये वापरल्यास ताजेतवाने वाटते. आणि निद्रानाश असल्यास असा चहा प्यायल्याने झोपही चांगली लागते.
चहामुळे वजन वाढते असे ब-याचदा लोकांकडून ऐकायला मिळते. अशा वेळी तुम्ही चहात साखरेऐवजी गूळ वापरल्यास आणि दूधाचा वापर न केलेला कोरा चहा प्यायल्यास वजनही नियंत्रणात राहते.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)