मे महिन्याच्या उकाड्यानंतर गारवा देणारा पाऊस अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच सुखद वाटतो. ताजे, टवटवीत वातावरण प्रसन्न करणारे असले तरी या काळात अनेक आरोग्याच्या समस्या, आजारपण डोके वर काढू लागतात. त्यामुळे पावसाळ्यात आपल्या दैनंदिन सवयीत लहानसहान बदल करणे, आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तसंच लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. योग्य ती खबरदारी घेतल्यास आजारपण टाळता येईल, अनेक समस्या कमी करता येतील. (Monsoon Health Tips: पावसाळ्यात कशा पद्धतीचा चहा पिणे शरीरास आहे फायदेशीर, वाचा काही खास टिप्स)
पावसाळ्यात ताप, सर्दी, खोकला, निमोनिया, मलेरिया या समस्या वृद्धांमध्ये अधिक आढळतात. वयोमामानानुसार आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे वृद्ध व्यक्ती आजारपणाला लवकर बळी पडतात. त्यामुळे उपचारापेक्षा खरबदारी घेणे केव्हाही योग्यच. त्यामुळे पुढील समस्या आपण टाळू शकतो. त्यामुळे पावसाळ्यात वृद्धांची नेमकी कशी काळजी घ्याल, यासाठी काही खास टिप्स:
पावसाळ्यात आजार होण्यापूर्वी वृद्धांमध्ये दिसतात ही लक्षणे:
# भूक न लागणे.
# सतत झोप येणे, उर्जेची कमतरता जाणवणे.
# थकवा जाणवणे.
# ताप येणे.
पावसळ्यात आजारपण टाळण्यासाठी खास टिप्स:
# वृद्धांना गर्दीच्या ठिकाणे नेणे टाळा किंवा त्यांना गर्दीच्या ठिकाणी जाण्यास रोखा. सध्या कोविड-19 च्या कठीण काळात तर वृद्धांचे बाहेर पडणे धोकादायक ठरु शकते.
# आजारपण जाणवल्यास स्वतःच्या मनाने औषधे घेणे टाळा. त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
# अस्थमा आणि हृदयविकार असणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
# शरीर हायड्रेट राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्या.
# सात्विक अन्नाचे सेवन करा.
# घरातील वृद्धांना influenza ची लस देणे योग्य ठरेल.
विशेष म्हणजे वृद्धांना ताणमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण ताण-तणावांमुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या उद्धवू शकतात. तसंच त्याचा परिणाम रोगप्रतिकारक शक्तीवरही होतो.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)