Shevgyachya Bhaji (Photo credits: Instagram)

यंदा गोकुळाष्टमी म्हणजेच श्री कृष्ण जन्माष्टमीचा (Janmashtami) सोहळा 23 ऑगस्ट दिवशी रंगणार आहे तर 24 ऑगस्ट दिवशी दहीहंड्या फोडून गोपाळकाला (Gopalkala) साजरा केला जाणार आहे. माखनचोर नावाने ओळखला जाणार्‍या बाळकृष्णाच्या गोष्टींमध्ये तो आवडीने तूप,लोणी, दूधावर ताव मारायचा हे आपल्याला ठाऊक आहे त्यामुळे जन्माष्टमीच्या रात्री या सार्‍यांचा वापर करून गोपाळकाला बनवला जातो. पण यासोबतीने जे कृष्णभक्त जन्माष्टमीचा उपवास करतात ते नैवेद्यामध्ये भाताचा समावेश टाळून आंबोळ्या, घावणे, काळ्या वाटाण्याची उसळ आणि सोबतीने शेवग्याच्या भाजीचा समावेश केला जातो. ऐरवी शेवग्याच्या शेंगा (Drumsticks) मोठ्या आवडीने खाल्ल्या जातात पण खास जन्माष्टमीच्या दिवशी हमखास महाराष्ट्रामध्ये शेवग्याची भाजी (Shevgyachya Bhaji) करण्याची प्रथा आहे. Janmashtami 2019 Recipes for Fast: गोकुळाष्टमी साठी पौष्टिक आणि चविष्ट अशा 5 उपवासाच्या रेसिपीज

भारतीय सण हे केवळ सेलिब्रेशनचा भाग नसून त्यामागे काही आरोग्य, मानवी शारिरीक आणि मानसिक संतुलन जपण्याचेही काही संकेत असतात. श्रावणात येणारी जन्माष्टमी म्हणजे पावसाळ्याचे दिवस असतात. यामध्ये पचनशक्ती मंदावत असल्याने हलका आहार घेण्यासाठी व्रत वैकल्यांचं कारण केलं जातं. जन्माष्टमी दिवशी देखील लंघन केले जाते. अनेकजण एक वेळ जेवतात. रात्रीच्या जेवणात अनेक ठिकाणी भात विरहीत जेवण बनवले जाते. यामध्ये शेवग्याच्या पाल्याचा भाजीचा समावेश असतो. एरवी खास ही भाजी क्वचितच बनवली जाते त्यामुळे किमान जन्माष्टमीच्या दिवशी या भाजीची चव काही आरोग्यदायी फायद्यासाठी नक्की चाखा.

शेवग्याच्या पानांंची भाजीचे आरोग्यदायी फायदे

  • मधूमेहींसाठी शेवग्याची पानं फायदेशीर आहेत. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
  • शेवग्याच्या पानांमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे अनेक आजारांचा धोका कमी करण्यास मदत होते. हृद्याचे कार्य सुरळित होण्यास मदत होते.
  • शेवग्याच्या पानांमध्ये दाहशामक क्षमता असल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते.
  • महिलांच्या आरोग्यासाठी शेवग्याचा पाला हा फायदेशीर आहे. मासिकपाळीच्या त्रासापासून ते त्याची अनियमितता टाळण्यासाठी मदत होते.
  • शेवग्याच्या पानांमुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे मधूमेहींसोबतच रक्तदाबाचा त्रास असणार्‍या लोकांनाही शेवग्याचा पाला आहारात घेणं फायदेशीर ठरू शकतं.

शेवग्याच्या पानांंची भाजी

गोकुळाष्टमी म्हणजेच श्री कृष्णजन्माष्टमीचा उपवास करण्यामागे अनेक इच्छा आहेत. चांगल्या संततीप्राप्तीसाठी जन्माष्टमीचा उपवास महाराष्ट्रासह देशभरात विवाहित आणि अविवाहीत महिला करतात.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)