Janmashtami 2019 Recipes for Fast: गोकुळाष्टमी साठी पौष्टिक आणि चविष्ट अशा 5 उपवासाच्या रेसिपीज
Fast Recipes (Photo Credits: YouTube)

Janmashtami 2019: गोकुळाष्टमी साठी सर्वत्र जोरदार तयारी सुरु झाली असून श्रीकृष्णाचा जन्मदिवस सोहळा मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व भाविक तयारीला लागले आहेत. या दिवशी गोकुळाष्टमीचे विशेष व्रत केले जाते. संतती, संपत्ती प्राप्तीसाठी हे व्रत केले जाते असे शास्त्रात सांगितले आहे. हा उपवास स्त्रियांनी केल्याने मासिक पाळी, स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणा कमी होतो असे सांगितले जाते. या दिवशी एकदाच जेवायचे असते असे शास्त्रात म्हटले आहे. त्यामुळे या जेवणात उपवासाचे पदार्थ असले पाहिजे.

आजच्या धकाधकीच्या जीवनामुळे नोकरदार वर्गाला किंवा घरगुती कामे करणा-या महिलांना निर्जली उपवास करणे शक्य नसते. त्यामुळे तुमच्या प्रकृतीनुसार आणि वयानुसार तुम्हाला जे खाता येईल असे उपवासाचे पदार्थ अवश्य खावे, असे समित ठोसर गुरुजींनीचे म्हणणे आहे. त्यामुळे पाहूयात अशा काही खास उपवासाच्या रेसिपीज

1. साबुदाण्याचे थालिपीठ

2. वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी

3. राजगिरी बटाटा पुरी

4. उपवासाचे बटाटे वडे

5. दही वडा

हेही वाचा- Janmashtami 2019: राशीनुसार 'या' पद्धतीने करा श्रीकृष्णाचा श्रृंगार आणि नैवेद्याचा बेत, सर्व इच्छा होतील पूर्ण

उपवास हा धान्य फराळाचाही केला जातो, ज्यात राजगि-याचा लाडू, शेंगदाण्याचा लाडू, दूध यासारख्या गोष्टींचाही समावेश केला तरी उत्तम असे ठोसर गुरुजींनी म्हणणे आहे. गोकुळाष्टमीच्या दुस-या दिवशी किंवा रात्री 12 वाजल्यानंतरही हा उपवास सोडता येतो. यावेळी तुम्ही तुमचे नियमित जेवणही करु शकता.