Happy Janmashtami 2019: प्रेमवतार श्रीकृष्णाची पूजा प्रेमाने आणि मंत्रोच्चारण करत केली जाते. त्यामुळे श्रीकृष्ण प्रसन्न होते असे मानले जाते. मात्र जन्माष्टमीच्या दिवशी जर तुम्ही राशी अनुसार श्रीकृष्णाचा श्रृंगार आणि नैवद्याचा बेत केल्यास तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तर जाणून घ्या कोणत्या राशीने कशा पद्धतीने श्रीकृष्णाची पूजा केली पाहिजे.
मेष: या राशीमधील व्यक्तींनी श्रीकृष्णाला लाल रंगाचे वस्र श्रीकृष्णाजन्माष्टमी दिवशी परिधान करावेत. तसेच खडीसाखराच नैवेद्य दाखवत आपल्या मनातील भावना व्यक्त करा.
वृषभ: वृषभ राशीमधील व्यक्तींनी चांदीची कलाकुसर असलेल्या वस्तुंनी त्याचा श्रृंगार आणि पुजा करावी. तसेच पांढऱ्या रंगाचा टीका आणि दह्याचा नैवेद्य दाखवावा. असे केल्यास तुमच्यावर श्रीकृष्णाची कृपा नेहमी राहिल.
मिथुन: या राशीमधील व्यक्तीने श्रीकृष्णाचा श्रृंगार भरजरी वस्त्रांनी करावा. तसेच चंदनाचा टीका लावावा. नैवेद्यात दही दाखवत श्रीकृष्णासमोर आपल्या मनातील गोष्ट व्यक्त करावी. यामुळे व्यक्तीला कार्यात लाभ होते.
कर्क: कर्क राशीतील मंडळींनी पांढऱ्या रंगाचे वस्र श्रीकृष्णाला परिधान करावे. त्यानंतर केशर दुधाचा नैवेद्य त्याला दाखवावा. यामुळे संतान प्राप्ती होण्याचे सुख लाभते.
सिंह: या राशीमधील व्यक्तींनी गुलाबी रंगाचे वस्र कृष्णाला नेसावे. त्यानंतर अष्टगंधाचा टीका लावावा. तर नैवेद्यात दही आणि खडीसाखर दाखवावे. त्यामुळे समाजात मान-प्रतिष्ठा मिळते.
कन्या: कन्या राशीमधील व्यक्तींनी श्रीकृष्णाला हिरव्या रंगाचे वस्र परिधान करावे. तसेच माव्याच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवत त्याची पूजा करावी. यामुळे तुमच्या आयुष्यात श्रीकृष्णाची कृपावृष्टी सदैव राहिल.
तुळ: केशरी रंगाने जन्माष्टमीच्या दिवशी या राशीतील व्यक्तींनी कृष्णाला वस्र परिधान करावे. त्यानंतर तुपाचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने आयुष्यात भरपुर सुख लाभते असे मानले जाते.
वृश्चिक: या राशीतील व्यक्तींन लाल रंगाचे वस्र परिधान कृष्णाला परिधान करावेत. दुधाचा नैवेद्य दाखवावत पूजा करावी. असे केल्याने आयुष्यात सर्व दुख दूर होतील.
धनु: पिवळ्या रंगाचे वस्र परिधान करत श्रीकृष्णाला सजवावे. तसेच पिवळ्या रंगाची मिठाई सुद्धा नैवेद्यात द्यावी. यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात असलेल्या समस्या दूर होतील.
मकर: या राशीतील व्यक्तींनी पिवळ्या आणि लाल रंग असलेले वस्र कृष्णाला जन्माष्टमी दिवशी परिधान करावेत. तसेच खडीसाखरचा नैवेद्य दाखवत मनातील इच्छा व्यक्त करावी.
कुंभ: कुंभ राशीमधील व्यक्तींना निळ्या रंगाच्या वस्राने कृष्णाला जन्माष्टमीनिमित्त सजवावे. तर बालुशाहीचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने धनप्राप्ती होण्यास मदत होईल.
मीन: या राशीतील व्यक्तींना पितांबरी रंगाचे वस्र कृष्णाला परिधान करावेत. तसेच नैवेद्यात केशर बर्फीचा समावेश करावा. असे केल्याने कृष्णाचे प्रेम आणि आशीर्वाद लाभतो. तसेच व्यक्तीच्या आयुष्यात भरपुर आनंद येईल. (Krishna Janmashtami 2019: भगवान श्रीकृष्णाच्या 'या' मंत्रांचा जप करा, दुर होतील आयुष्यातील समस्या)
भगवान विष्णु यांचा आठवा अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीकृष्णाची महिमा संपूर्ण जगतात अगाध आहे. jaतसेच श्रीकृष्णाचे भक्त करोडोच्या संख्येने देभरात आहेत.गोकुळाष्टमीच्या रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्म उत्सव साजरा केला जातो. तर दुसर्या दिवशी हा उपवास सोडला जातो. तर 24 ऑगस्ट दिवशी गोपाळकाला हा सण साजरा केला जाणार आहे.
(सूचना: वरील दिलेल्या लेखातील माहिती ही प्रचलित मान्यतांच्या आधारावर देण्यात आलेली आहे. तसेच केवळ ही एक सुचनात्मक उद्देशातून लिहिण्यात आलेले आहे.याचा काही वास्तविक किंवा विशिष्ट परिणामांसोबत काहीही संबंध नाही. याबद्दल प्रत्येक व्यक्तीचा विचार हा वेगळा असू शकतो.)