प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

COVID-19 Sore Throat: ताप, खोकला आणि अंग दुखी आदी कोरोना विषाणूची लक्षणं (COVID-19 Symptoms) समजली जातात. ही सर्व लक्षणं सामान्य फ्लूप्रमाणेचं आहेत. तथापि, तज्ज्ञांच्या मते, घसा दुखणे देखील कोरोनाचं लक्षणं असू शकतं. घसा खवखवणे हे कोरोनाचे सर्वात मोठं लक्षणं आहे. आतापर्यंत 52 टक्के कोरोना रुग्णांमध्ये हे लक्षणं दिसून आलं आहे. परंतु, केवळ घसा खवखवणे हे कोरोना पॉझिटिव्ह असण्याचं लक्षणं नाही. अशा परिस्थितीत आपण कोरोना संक्रमित आहोत की, नाही हे निश्चित करणे कठीण आहे? खरं तर, घशात खवखवण्याची विविध कारणं असून शकतात. जसे की, हवामानातील बदल, टॉन्सिलिटिस बॅक्टेरियातील संसर्ग इ. ज्याप्रमाणे केवळ खोकला, ताप कोविड- 19 चे लक्षणं नाहीत. तसचं घसा खवखवणे हे कोरोनाचे लक्षण नाही. घसा खवखवणे सामान्य आहे की, कोरोना विषाणूच्या संसर्गाचे लक्षण आहे? हे खालील मुद्द्यांच्या आधारे जाणून घेता येईल...(हेही वाचा - Health Tips: आंघोळ करताना आपल्या शरीराच्या 'या' भागावर चुकूनही लावू नका साबण; अन्यथा उद्भवू शकतात आरोग्याशी संबंधित समस्या)

घशात त्रास होणं -

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कोविड -19 असणाऱ्या रुग्णांमध्ये आणि कोरोना नसणाऱ्या व्यक्तीला खोकला येणं यात काही वास्तविक फरक नाही. तथापि, आपल्या आरोग्याची तपासणी करण्यापूर्वी बाह्य घटक लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सामान्यत: बहुतेक लोकांना हवामानातील बदलामुळे घसा खवखवताना घशात दुखणे, सौम्य जळजळ किंवा खाज सुटण्याचा त्रास जाणवणे, याव्यतिरिक्त, अन्न आणि पाणी गिळताना त्रास होणे, कधीकधी कर्कश किंवा अस्पष्ट आवाज येणं, घशात सूज येणे, घसा खवखवण आदी समस्या उद्भवू शकतात. (हेही वाचा - COVID-19 च्या हवेतून संसर्ग होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर CDC कडून नियमावलीमध्ये बदल)

बदलणारे हवामान जबाबदार असू शकते-

बदलत्या हंगामात व्हायरस आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका वाढतो. हवामानातील बदलांमुळे सायनस, घश्यात खवखवणे आणि खोकल्याची समस्या उद्भवू शकते. म्हणून कोविडमुळे तुम्हाच्या घशात खवखवत आहे किंवा यासाठी बदलणारे हवामान जबाबदार आहे, हे सांगणे कठीण आहे.

घसा खवखवत असल्यास काय करावे? -

कोविड संसर्गामुळे घशात खोकल्याची समस्या जाणवत असल्यास आपल्याला काही काळजी घ्यावी लागेल. कोरोनाच्या संसर्गामुळे आपल्याला घशात त्रास होत आहे की, नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला कोविड- 19 चाचणी करून घ्यावी लागेल.

या गोष्टींची काळजी घ्या -

कोरोना संक्रमित रुग्णाला किंवा सामान्य व्यक्तीला घशा संबंधित त्रास जाणवत असेल, तर त्याला प्रचंड अस्वस्थ वाटते. त्यामुळे अशा परिस्थितीत आपण स्वत: ची औषधोपचार करणं टाळलं पाहिजे आणि डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.

याशिवाय घशात त्रास होत असल्यास तुम्ही यावर काही घरगुती उपायदेखील करू शकता. आयुर्वेदिक काढा, गरम पेये घेतल्याने घशात थोडा आराम मिळतो. तसेच घसा खवखवण्याच्या समस्येवर गरम पाण्याची वाफ घेणं, गार्गल करणं फायदेशीर ठरू शकते. घसा दुखीचा त्रास होत असणाऱ्या व्यक्तीने थंड पदार्थांचे सेवन करणे टाळावे आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविणार्‍या पदार्थांचे सेवन करावे.