भारतासह जगभरामध्ये कोरोना व्हायरसने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. मागील सहा महिन्यांपासून या व्हायरसमुळे कोविड 19 (Covid 19) चा आजार झपाट्याने पसरत आहे. जसे संशोधन मोठ्या प्रमाणात केले जात आहे तसे या आजाराबद्दल आणि कोरोना व्हायरसबद्दल नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. दरम्यान आता कोविड 19चा संसर्ग हवेतून देखील होऊ शकतो या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेमध्ये CDC (Centers for Disease Control and Prevention)ने आपल्या नियमावलीमध्ये बदल केले आहेत. मागील अनेक दिवसांपासून कोविड 19 आजारात Airborne Transmission च्या शक्यतेबद्दल चर्चा सुरू होती. अनेकांनी त्याबद्दल भीती देखील व्यक्त केली होती.
काही दिवसांपूर्वी CDC कडून याच विषयावर एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता त्यानंतर तो पुन्हा मागे घेण्यात आला होता. आता याच पार्श्वभूमीवर सीडीसीने नियमावलीमध्ये बदल केले आहेत. Coronavirus Symptoms: खोकला, ताप यांसह समोर आली कोरोना विषाणूची नवीन सहा लक्षणे, घ्या जाणून.
सोमवार (5 ऑक्टोबर) दिवशी कोविड 19च्या नियमावलीत बदल करताना त्यांनी कोविड 19 हा बंद वातावरणामध्ये 6 फूट पेक्षा अधिक अंतर असलेल्या व्यक्तींमध्येदेखील पसरू शकतो असा अहवाल देण्यात आला आहे. कोरोनाच्या संसर्गामध्ये ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून, त्याच्या संपर्कातून कोविड 19 ची लागण होऊ शकते असे सांगितले होते. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगच्या नियामांमध्ये 6 फूटाचे अंतर पाळा असा नियम होता मात्र आता हवेत धुरामध्ये लहान ड्रॉपलेट्स राहू शकतात, प्रवास करू शकतात असे सांगण्यात येत आहे. तसेच COVID-19 च्या संसर्गामध्ये व्हायरसचे हवेमध्ये aerosols lingering राहणं हे संसर्ग पसरण्यासाठी अधिक कारणीभूत ठरू शकते असे देखील सांगण्यात आले आहे.
संशोधकांच्या दाव्यानुसार, व्हायरस हा aerosols मध्ये हवेत काही सेकंद ते तास राहू शकतो. 2 मीटरपेक्षा जास्त प्रवास करू शकतो तर ज्या बंद वास्तू मध्ये योग्य व्हेंटिलेशन नसेल तेथे हा व्हायरस सुपरस्प्रेडर ठरू शकतो. म्हणजेच अनेकांना त्रासदायक ठरू शकतो.
CDC च्या गाईडलाईन्सनुसार, आता आरोग्य यंत्रणांनी खोकला किंवा शिंकेमधून बाहेर पडलेल्या ड्रॉप्लेट्सच्या आणि aerosols मधील व्हायरस यांच्यामधील नेमका फरक ओळखणं शिकायला हवं. सोबतच मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं याच्याबरोबरीने इनडोअर मधील हवा खेळती ठेवत आऊटडोअर अॅक्टिव्हिजीजवर भर देणं अधिक महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे.