India's CAR-T cell therapy NexCAR19: भारतातील पहिला रुग्ण 'कर्करोगमुक्त'; स्वदेशी सिएआर-टी थेरपीस मोठे यश
Cancer Cell | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

India's First Patient Cancer Free: कर्करोग (Cancer News) हे मानवी आरोग्यापुढील एक मोठे आणि तितकेच जीवघेने आव्हान नेहमीच राहिले आहे. जगभरामध्ये कॅन्सर पूर्ण बरा करण्यासाठी उपचारपद्धती (Cancer Treatments) शोधली जात आहे. मात्र, त्याला अद्यापतरी म्हणावे तसे यश आले नाही. मात्र, भारतीय संशोधकांनी निर्माण केलेल्या CAR-T Cell Therapy (सीएआर-टी सेल थेरपी) द्वारे या आशा पल्लवीत झाल्या आहेत. भारतीय CAR-T सेल थेरपी उपचारांद्वारे पहिला रुग्ण 'कर्करोगमुक्त' झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे. जगभरात कर्करोगाविरोधात सुरु असलेल्या लढ्याला भारतीय उपचारांमुळे प्राथिनिधीक स्वरुपात यश आल्याचे मानले जात आहे. दिल्लीतील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. (कर्नल) व्हीके गुप्ता हे CAR-T सेल थेरपीद्वारे कर्करोगमुक्त घोषित झालेले भारतातील पहिले रुग्ण ठरले आहेत. हे नाविन्यपूर्ण उपचार कर्करोगाशी लढण्यासाठी रुग्णाच्या रोगप्रतिकारक शक्तीला अनुवांशिकदृष्ट्या पुनर्निर्मित करते.

CDSCO द्वारे सीएआर-टी सेल थेरेपीच्या व्यावसायिक वापरास मंजूरी

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने काही महिन्यांपूर्वीच सीएआर-टी सेल थेरेपी च्या व्यावसायिक वापरास मंजूरी दिली होती. या थेरेपीमध्ये कर्करोग विरोधात लढण्यासाठी रुग्णाच्या रोगप्रतिकारक शक्तीला अनुवांशिकदृष्ट्या पुनर्निर्मित केले जाते. दावा केला जात आहे की, आज ही थेरेपी असंख्य रुग्णांसाठी जीवनरक्षक बनली आहे. ज्यामध्ये दिल्ली येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ (कर्नल) व्हीके गुप्ता यांचाही सहभाग आहे. डॉ. गुप्ता यांच्याकडे भारतीय लष्करात काम करण्याचा जवळपास 28 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी केवळ 42 लाख रुपयांमध्ये थेरेपी घेतली. विदेशामध्ये याच थेरेपीसाठी किमान 480,000 डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये तब्बल 4 कोटी रुपये घेतले जातात. (हेही वाचा, mRNA Cancer Vaccine Trial: कॅन्सर वरील उपचारांमध्ये आता 'mRNA'लस संजीवनी ठरणार? UK मध्ये ट्रायल्स सुरू)

कर्नल डॉ. व्ही के गुप्ता CAR-T सेल थेरपीद्वारे कर्करोगमुक्त होणारे पिहिले भारतीय व्यक्ती

टाटा मेमोरियल हॉस्पीटलमध्ये कर्नल डॉ. गुप्ता यांची शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेबाबत बोलताना डॉक्टरांनी सांगितले की, कर्नल गुप्ता हे कर्करोगातन मुक्त झाले आहेत. या थेरेपीद्वारे कर्करोगमुक्त होणारे कर्नल गुप्ता हे पहिला व्यक्ती ठरले आहेत. आजपर्यंत असंख्य रुग्ण आणि डॉक्टरही कर्करोगमुक्तीचे स्वप्न पाहात होते. पण, गुप्ता यांच्या रुपात हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. 'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, संशोधक अलका द्विवेदी यांच्या नेतृत्वाखाली, एका भारतीय संशोधन पथकाने NexCAR19 च्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. ही एक ग्राउंडब्रेकिंग थेरपी आहे जी CAR-T पेशींना अधिक मानवासारखी प्रतिपिंड वाहून नेण्यासाठी सुधारित करते. त्यांनी म्हटले आहे की, NexCAR19 रुग्णाच्या रक्तातून T पेशी काढून आणि ल्युकेमिया आणि लिम्फोमा पेशींवर आढळणाऱ्या CD19 प्रथिनांना लक्ष्य करणारे chimeric antigen receptor (CAR) सादर करून कार्य करते. थेरपीच्या "मानवीकृत" डिझाइनचा उद्देश रोगप्रतिकारक प्रणाली नाकारणे कमी करताना परिणामकारकता वाढवणे आहे. (हेही वाचा, Cancer Deaths in India: भारतामध्ये एका वर्षात कर्करोगामुळे तब्बल 9.3 लाख मृत्यू, समोर आली 12 लाख नवीन प्रकरणे- Lancet Study)

हेमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट आणि ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (ACTREC), टाटा मेमोरियल सेंटर, येथे सहयोगी प्राध्यापक असलेल्या डॉ हसमुख जैन यांच्या हवाल्याने 'इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नल डॉ. गुप्ता यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, ते कर्करोगाच्या पेशींपासून पूर्णपणे मुक्त आहेत. त्यांच्या आजीवन बरा होण्याचा दावा करणे अकाली असले तरी, रुग्ण सध्यातरा ते कर्करोगाच्या पेशींपासून मुक्त आहेत.