कोविड -19 या महामारीने सर्व मानवजातीसमोर दुर्व्यवस्थेची स्थिती निर्माण केली आहे. या परिस्थितीविरूद्ध संरक्षण करण्याची पहिली पायरी म्हणजे सॅनिटायझर्स, फेस मास्क यांचा वापर आणि कोविड योग्य वर्तन ही आहे. कोविड -19 चा संसर्ग होण्यापासून रक्षण करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) फेसमास्कची शिफारस केली आहे. खासकरुन एन 95 प्रकारचे मास्क हे संसर्ग झालेल्या व्यक्तीकडून संसर्ग न झालेल्या व्यक्तीकडे कोविड-19 विषाणूंचे संक्रमण कमी करण्यासाठी अधिक प्रभावी मानले गेले आहेत. परंतु एन 95 फेस मास्कचा वापर करणे बर्याच जणांना आरामदायक वाटत नाही, तसेच बहुतेकदा ते धुता येत नाहीत.
परीशोधन टेक्नोलॉजीज प्रा. लिमिटेड ला अनेक पदरी हायब्रीड फेस मास्क, एसएचजी -95 ® (बिलियन सोशल मास्क) विकसित करण्यासाठी, जलदगती कोविड -19 निधीअंतर्गत बिराक अर्थात जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परीषदेने आणि आयकेपी नॉलेज पार्क यांनी अंशतः सहाय्य केले. हे पूर्णतः भारतीय बनावटीचे मास्क, हवेतील आकाराने मोठे कण (> 90%) आणि बॅक्टेरिया जंतू गाळण्याच्या प्रक्रियेत(> 99%) इतकी उच्च कार्यक्षमता प्रदान करतात. हे मास्क व्यवस्थित श्वासोच्छ्वास घेणे सुनिश्चित करतात, कानाच्या पाळ्यांसाठी आरामदायक आहेत तसेच ते पूर्णपणे हाताने विणलेल्या कापसापासून तयार केले असल्या कारणाने उष्णकटिबंधीय परिस्थितीत देखील वापरण्यास सोयीस्कर आहेत. एक विशेष गाळण्याची सोय त असलेला थर असणे, हा त्याचा आणखी एक फायदा आहे. या हाताने धुण्यायोग्य आणि पुन्हा वापरता येण्याजोग्या फेस मास्कची किंमत, कंपनीकडून प्रति मास्क अंदाजे 50-75 रुपये इतकी निश्चित केली आहे, यामुळे ती सर्वसामान्यांनाही परवडू शकेल.
सुमारे 1,45,000 हून अधिक मास्क ची विक्री केलेला, हा उपक्रम कोविड -19 च्या कालावधीतील मागण्या पूर्ण करणारा, अनेक स्वयं-मदत गटांच्या (एसएचजी) उदरनिर्वाह विकसित करण्यासाठी,उपयोगी पडत असून ग्रँड चॅलेंज कॅनडा द्वारे त्यास वित्तपुरवठा करण्यात आला आहे. परीशोधन टेक्नॉलॉजीज प्रा. लिमिटेडने केलेल्या या उपयोजित संशोधनामुळे आणि उचित किमतीच्या उत्पादनांचा विकास केल्याने मानवजातीला भेडसावणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्याची कल्पना सत्यात उतरली आहे.
Safety & Comfort to the user and Livelihood for the Artisans - this is what SHG-95 masks offer! Thank you @AIC_CCMB for supporting #BillionSocilaMaks initiative @gchallenges @BIRAC_2012 @AIMtoInnovate @IKP_SciencePark @Samhitadotorg @DrChintan_V @SEWAFed @SaheliWorld @TataPower pic.twitter.com/dHP9MNTlR9
— Parisodhana Technologies (@parisodhana) April 25, 2021
जैवतंत्रज्ञान विभागाबद्दल:
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा जैवतंत्रज्ञान विभाग (डीबीटी) शेती, आरोग्यसेवा, प्राणी विज्ञान, पर्यावरण आणि उद्योग या क्षेत्रांसाठी जैव तंत्रज्ञानाचा उपयोग करतो .
जैव तंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषद (बीआयआरएसी) या बद्दल:
भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने (डीबीटी),कलम 8,सूची ब अंतर्गत ना नफा तोटा ना तत्वावर स्थापन केलेला सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम,जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषद (बीआयआरएसी),ही जैव तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी,सुधारण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी इंटरफेस एजन्सी म्हणून कार्य करत असून ती देशाच्या उत्पादन विकासाच्या गरजेच्या संदर्भात धोरणात्मक संशोधन आणि विकास उपक्रम राबविणारी परीषद आहे.
परिशोधन टेक्नोलॉजीज प्रा. लि.
परिशोधन टेक्नोलॉजीज प्रा. लिमिटेडचे लक्ष्य सध्या आरोग्यसेवा आणि निरामयतेशी संबंधित उत्पादने विकसित करणे हे आहे. ही कंपनी जून 2016 पासून हैदराबाद, भारत येथे एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून नोंदणीकृत झालेली कंपनी आहे.