Breast Ironing | (Photo courtesy: archived, edited images)

Breast Ironing: अफ्रिका (Africa) देशात प्रदीर्घ काळापासून चालत आलेली ब्रेस्ट आयरनिंग (Breast Ironing) ही अघोरी परंपरा ( African Practice) आता इंग्लंडसारख्या (Britain ) पुढारलेल्या देशातही मोठ्या प्रमाणावर फोफावत असल्याचे वृत्त आहे. ब्रेस्ट आयरनिंग या पद्धतीत लहान मुलींच्या स्थनांवर आगीत गरम केलेला अत्यंत उष्ण दगड ठेवला जातो. जेणेकरुन स्त्रीच्या स्थानाची वाढ होणार नाही. आतापर्यंत अनेक स्त्रिया आणि मुलींना या विचित्र आणि अघोरी परंपरेचा ( Practice) सामना करावा लागला आहे. यातना भोगाव्या लागल्या आहेत. विशेष म्हणजे पुरुषांची वाईट नजर स्त्रीवर पडू नये आणि तिचा बचाव व्हाया या हेतूने ही पद्धत वापरली जाते. Breast ironing केल्याने स्त्रियांचे स्थन वाढणार नाहीत. त्यामुळे त्यांचे लैंगिक शोषण होणार नाही तसेच, पुरुषांची वाईट नजर त्यांच्यावर पडणार नाही, असे मानले जाते.

'द गार्डियन' नावाच्या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, आजवर अफ्रिकी देशात वापरली जाणारी ही पद्धत आता इंग्लंडसारख्या पुढारलेल्या देशातही मोठ्या प्रमाणावर वापरली जात असून, दिवसेंदिवस ती अधिकच फोफावताना दिसत आहे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या हवाल्यने द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, लंडन, यॉर्कशायर, एसेक्स आणि पश्चिम मिडलँड या प्रदेशांमध्ये ही पद्धत वापरली जात आहे. अत्यंत अपमानास्पद आणि वेदनादायी असलेल्या या परंपरेच्या अनेक मुली बळी पडल्या आहेत. यात अत्यंत दुर्दैवी असे की, प्रामुख्याने अत्यंत लहान अशा कोवळ्या (पौगंडावस्थेतील) मुलींसोबत हा अघोरी प्रकार केला जात आहे.

संयुक्त राष्ट्र संघानेही ब्रेस्ट आयरनिंग (Breast Ironing) ही प्रथा अत्यंत वाईट आणि दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तसेच, जगातील पाच मोठ्या गुह्यांमध्ये या प्रथेचा समावेश केला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्देशानुसार ही पद्धत आज जगातील पाच मोठ्या गुन्ह्यांपैकी एक मानली जाते. त्यामुळे ही पद्धत वापरण्यावर आंतरराष्ट्रीय निर्बंध आहेत. मात्र, तरीही ही पद्धत वापरली जाते हे धक्कादायक वास्तव. ब्रेस्ट आयरनिंग हा गुन्हा अंडर रेडिट क्राईम या कक्षेखाली येतो. या कक्षेतील गुन्हे हे लिंगवार अधारीत हिंसेत मोडतात. अंडर रेटिड क्राईम याचा अर्थ असा की, या गुन्ह्यांची पोलिसांना कल्पना दिली जात नाही.

या गुन्ह्यांमध्ये आणखी एक धक्कादायक असे की, हा गुन्हा करणाऱ्या किंवा या पद्धतीला अधिक प्रोत्साहन देण्यात महिलाच आघाडीवर असतात. खास करुन मुलींच्या आई. या महिला ही एक परंपरेने चालत आलेली प्रथा म्हणून आपण तिचे पालन केले पाहिजे असे मानतात, असे सांगितले जाते. वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक आणि तज्ज्ञ या पद्धतीला चाइल्ड अॅब्यूज मानतात. Breast Ironing ची बळी ठरल्यावर पीडित व्यक्तिच्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो. हे परिणाम शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळींवरचे असतात. ब्रेस्ट आयरनिंग झालेल्या मुलींना भविष्यात माता झाल्यानंतर स्थनपान करण्यात अडचणी येतातच. परंतु, अनेकदा त्या स्थनपान करण्यास असमर्थही ठरु शकतात. शिवाय या पद्धतीमुळे मुलींच्या स्थनांचा आकार बिघतो, त्यांना स्थनांचा कर्करोग (Breast cancer) होण्याची शक्यताही मोठी असते. (हेही वाचा, आता सेक्ससाठी महिलांना पुरुषांची गरज नाही; ही खेळणी देत आहेत परमोच्च आनंद)

एका सामाजिका कार्यकर्त्याने म्हटले आहे की, त्यांना अशी 15 ते 20 प्रकरणे माहिती आहेत जी दक्षिण लंडण आणि टाऊन क्रोयडोन येथे घडली आहेत. या कार्यकर्त्याने सांगितले की, कुटुंबातील वयस्कर व्यक्ती एक आगीने अत्यंत गरम केलेला दगड स्थनांवर ठेवते. यात मुलीची आई, आजी, चुलती किंवा जवळीच नातेवाईक महिला असे प्रकार करण्यात पुढाकार घेतात. त्या या गरम दगडाचे चटके मुलींच्या स्थनांना अनेकदा देतात. इतक्यांदा की स्थनातील पेशी जळू शकतील. ज्यामुले स्थनांची नैसर्गिक वाढ कमी होईल.

या सामाजिक कार्यकर्त्याने असेही म्हटले आहे की, ही पद्धत (Breast Ironing) काही प्रकरणात आठवड्यातून एकदा केली जाते काही प्ररणांमध्ये ही पद्धत आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा केली जाते. ही पद्धत कधी कधी वापरायचे हे सर्वस्वी ही पद्धत वापरणाऱ्या महिलेवर अवलंबून असते. इथे मुलींच्या भावनांना विचारांना काहीच महत्त्व नसते. महिला आणि मुलींसाठी काम करणारी एका एनजीओची प्रमुख मार्गारेट न्युयदजेविरा हिने प्रसारमाध्यमांना सांगितले की, आतापर्यंत इंग्लंडमध्येही सुमारे 1 हजार किंवा त्याहून अधीक मुलींना या अघोरी प्रथेचे चटके सोसावे लागले आहेत. बेकायदेशीर असली तरी रही पद्धत वापरली जात आहे. मात्र, त्याचा एकत्रित डेटा पुढे आला नाही.

दरम्यान, या सर्व प्रकारावर ब्रिटन सरकारचे म्हणणे असेकी, ही प्रथा बंद करण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. येत्या काही काळा ही प्रथा पूर्णपणे नष्ट केली जाईल. ही प्रथा नष्ट करण्यासाठी बरेच काम झाले आहे, असेही सामाजिक कार्यकर्ते सांगतात.