केंद्र सरकार 1 मार्चपासून कोविड-19 लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करत आहे. या टप्प्यात 60 वर्षांवरील आणि 45 वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लसीचे डोस देण्यात येणार आहेत. यासाठी सरकारी आणि खाजगी लसीकरण केंद्र सज्ज असून सरकारी केंद्रांवर लस मोफत देण्यात येणार आहे. तर खाजगी केंद्रावर त्यासाठी शुल्क आकारले जाईल. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 10,000 सरकारी तर 20,000 खाजगी केंद्र सज्ज झाली आहेत. मात्र येत्या 3-4 दिवासांत आरोग्य मंत्रालयाकडून लसीचे दर ठरवण्यात येणार आहेत. त्यासाठी निर्माते आणि हॉस्पिटल्सशी चर्चा करण्यात येणार आहे.
दरम्यान, सरकारने कोविड-19 लसीकरण मोहिमेसाठी कोव्हिन अॅप लॉन्च केले आहे. 60 वर्षांवरील आणि 45 वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लस मिळवण्यासाठी या अॅपच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करावे लागेल. जाणून घेऊया या प्रक्रीयेबद्दल... (Coronavirus: केंद्राकडून राज्यांना COVID-19 Vaccination वाढविण्याच्या सूचाना)
# डाऊनलोड CoWIN अॅप.
# इलेक्शन आयडी, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट ही कागदपत्रं अपलोड करुन साईन अप करा.
# त्यानंतर सिस्टमकडून कागदपत्रं पडताळणी केली जाईल.
# सर्व कागदपत्रं खरी असतील तर तुम्ही लसीकरणासाठी अप्लाय करु शकता.
# तुमचा रिक्वेस्ट प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला कोविड ठराविक तारीख, वेळ आणि ठिकाण मेसेजद्वारे कळवण्यात येईल.
प्रौढ व्यक्तींसाठी वॉक-इन-रजिस्ट्रेशन सुरु करावे, असा सल्ला काही तज्ञांनी सरकारला दिला आहे. परंतु, यावर सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याम्ध्ये सुमारे 3 कोटी आरोग्यसेवक आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना लस देण्याचे सरकारने योजले होते. त्यापैकी सध्या 1.19 कोटी लोकांना यशस्वीरीत्या लस देण्यात आली आहे.