Coronavirus: केंद्राकडून राज्यांना COVID-19 Vaccination  वाढविण्याच्या सूचाना
Coronavirus | | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

राज्यात वाढत असलेल्या कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या पाहता केंद्र सरकारने कोरोना व्हायरस लसिकरण (COVID-19 Vaccination) वाढविण्याच्या सूचना राज्य सरकारांना दिल्या आहेत. याशिवाय केंद्राने कोरोना नियंत्रण आणि उपाययोजनांसाठी राज्यांना हातभार लागाव यासाठी काही पथकेही राज्यांमध्ये पाठवली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशामध्ये 13,742 नवे कोरोना रुग्ण बुधवारी आढळून आले आहेत. वाढत्या रुग्णांना आळा घालण्यासाठी केंद्राने कोरोना लसीकरणावर भर देण्यास सांगितले आहे.

देशभरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या पाहता ही संख्या महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश आणि पंजाब आदी राज्यांमध्ये अधिक प्रमाणावर आहे. अनुक्रमे हे प्रणाण 127,55 आणि 54% इतके आहे. (हेही वाचा, Maharashtra Police: कोविड-19 च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कार्यालयीन वेळेत बदल; 'वर्क फ्रॉम होम'चाही पर्याय)

दरम्यान, देशातील काही राज्यांमध्ये वाढत असलेली कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या पाहाता दिल्ली सरकार सावध झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश आणि पंजाब आदी राज्यांमधून दिल्लीमध्ये येणाऱ्या नागरिकांना दिल्ली सरकारने RT-PCR Test बंधनकारक केल्याचे वृत्त आहे. प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. ज्या नागरिकांची RT-PCR Test झाली असेल त्यांनाच दिल्लीमध्ये प्रवेश मिळेल असेही समजते.

गेल्या आठवडाभरापासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातील जवळपास 86% कोरोना रुग्ण हे महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश आणि पंजाब आदी राज्यांतून असल्याचे पुढे येतआहे. त्यामुळे दिल्लीत या रुग्णवाढीचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे समजते. प्रसारमाध्यमांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे की, दिल्ली सरकारकडून या पाच राज्यांच्या नोडल अधिकाऱ्यांना सांगितले जाण्याची शक्यता आहे की, आपल्या राज्यातून दिल्लीला येणाऱ्या नागरिकांची 72 तासांपूर्वी निगेटीव्ह RT-PCR टेस्ट निश्चित करावा. त्यानंतर त्यांना दिल्लीच्या दिशेने निघू द्यावे.