स्वच्छतेचं महत्त्व आपल्याला लहानपणापासून शिकवलं आहे. काहीही खाण्यापूर्वी, शौचास जावून आल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत याचे संस्कार आपल्यावर झालेले आहेत. मात्र कोरोना व्हायरसच्या या संकटात हात धुण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. खरंतर हात धुणे अगदी सोपे आहे. पण केवळ 5% लोक हातावरील जंतू नष्ट होईपर्यंत हात धुतात, असे एका अहवालातून स्पष्ट दिसून आले आहे. मात्र हात धुण्यासाठी योग्य तो वेळ दिला नाही तर इंफेक्शन, आजार पसरण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे केवळ कोरोना व्हायरस संकटातच नाही तर इतर वेळी देखील हात स्वच्छ धुण्यावर आपला भर असला पाहिजे. कारण आजाराला आळा घालण्यासाठी आणि इंफेक्शनचा प्रसार टाळण्यासाठी हात स्वच्छ धुणे हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. तर जाणून घेऊया हात धुण्याची योग्य पद्धत: (प्रियंका चोप्रा हिने पूर्ण केले Safe Hand Challenge; व्हिडिओ शेअर करत अमिताभ बच्चन, निक जोनस सह परिणीति चोप्रा हिला केले नॉमिनेट)
किती वेळ हात धुणे गरजेचे आहे?
हातावरील जंतू नष्ट करण्यासाठी किमान 20 सेकंद हात धुणं गरजेचं आहे. हे तुम्हाला कंटाळवाणे वाटत असेल तर हाता धुताना तुम्ही तुमच्या आवडीचे गाणे, श्लोक असेही काहीही बोलू शकता. त्यामुळे 20 सेकंद भूरकन् उडून जातील. 20 सेकंदांपेक्षा कमी वेळ हात धुतल्याने फार काही फरक पडणार नाही. मात्र शक्यतो 20 सेकंद हात धुण्यावर अधिक भर द्या.
हात धुण्याची योग्य पद्धत काय?
# कोमट पाण्याने हात ओले करा.
# साबण किंवा हॅंड वॉश लावा.
# त्यानंतर हात एकमेकांवर चोळा. हाताची पुढची, मागची बाजून नीट चोळून घ्या. बोटांमध्ये चोळा. नखं चोळून स्वच्छ करा.
# हे सर्व किमान 20 सेकंद करा.
# त्यानंतर पाण्याने हात स्वच्छ धुवा.
# स्वच्छ टॉवेल, नॅपकिनने हात कोरडे करा.
हात धुण्यासाठी कोमट पाणी वापरणे नक्कीच फायदेशीर ठरेल. अधिक गरम पाण्याने जंतू मरतील असा विचार करु हात धुण्यासाठी गरम पाणी वापरू नका. हात धुण्यासाठी नळाचे वाहते पाणी वापरणे हा सुरक्षित पर्याय आहे. कारण साठवलेले पाणी लवकर दुषित होण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे हात धुताना पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे.