प्रियंका चोप्रा हिने पूर्ण केले Safe Hand Challenge; व्हिडिओ शेअर करत अमिताभ बच्चन, निक जोनस सह परिणीति चोप्रा हिला केले नॉमिनेट
Priyanka Chopra (Photo Credits: Instagram)

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छतेचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. स्वच्छता पाळण्याचे आवाहन विविध माध्यमातून केले जात आहे. त्याचबरोबर जागतिक आरोग्य संस्थेने स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी सेफ हँड चॅलेंज (Safe Hands Challenge) कॅंम्पेन सुरु केले आहे. त्याचबरोबर बॉलिवूडसह अनेक सेलिब्रेटींना हे चॅलेंज स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) देखील हे चॅलेंज स्वीकारत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहे.

या व्हिडिओत प्रियंका हात धुताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत प्रियंकाने वेळोवळी हात धुण्याचे महत्त्व आपल्या चाहत्यांना पटवून दिले आहे. तसंच कमीत कमी 20 मिनिटं हात धुणं महत्त्वाचे असल्याचेही तिने सांगितले. (Coronavirus बाबत जनजागृती करण्यासाठी WHO चे डायरेक्टर टेड्रोस यांचे 'Safe Hands' चॅलेंज स्वीकारण्याचे दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोप्रा यांना आवाहन)

प्रियंका चोप्रा व्हिडिओ:

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत प्रियंका चोप्राने अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), पती निक जोनस (Nick Jonas) आणि बहीण परिणिती चोप्रा (Parineeti Chopra )यांना नॉमिनेट केले आहे.

प्रियंका चोप्रा हिचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत असून तिने उचललेल्या या पावलाचे कौतुक होत आहे. यापूर्वी WHO एक्सपर्ट्सह इंस्टाग्राम लाईव्ह सेशनद्वारे प्रियंकाने कोरोना व्हायरस निगडीत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली होती.