अनेकांना प्रवासादरम्यान उलटी (Vomiting) होण्याची समस्या असते. किंबहुना आपल्याला प्रवासात उलटी होते या भीतीनेच अनेकजण प्रवास टाळतात. तर काही जण प्रवासादरम्यान उलटी होऊ नये म्हणून आपल्यासोबत नेहमी प्रवासी गोळ्या बाळगतात. मात्र अनेकदा काही लोकांना प्रवासाला निघायच्या गडबडीत हे गोळ्या घेणे आपण सपशेल विसरतो. अशा वेळी उलटी होऊ नये तुमच्या जवळ असलेल्या गोळ्या, चॉकलेट्स आणि लिमलेटच्या गोळ्या खातो.
हे तर झाले तात्पुरते उपाय. जर प्रवास लांबचा असेल तर हे उपाय जास्त वेळ काम करत नाही. अशा वेळी झटपट असे कोणते घरगुती उपाय आपल्याला करता येतील हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे.
1. लिंबू
जर तुम्हाला प्रवासात उलटी येत असेल तर नेहमी प्रवासापूर्वी तुमच्याजवळ लिंबू सोबत ठेवावा. प्रवासात जेव्हा तुम्हाला उलटी येतेय असं वाटेल तेव्हा लिंबू कापून त्यावर काळी मिरी आणि काळे मीठ लावून ते चाटावे. याने आपल्याला उलटी येणार नाही.
2. लवंग
प्रवासाआधी 2 लवंगाच्या पाकळ्या बारीक करुन त्याची पावडर एका डब्ब्यात भरून घ्या. जेव्हा तुम्हाला उलटी येईल असे वाटेल तेव्हा थोडीशी साखर किंवा काळे मीठ मिसळून ते खावे. याने तुम्हाला उलटी येणार नाही.
3. आलं
प्रवासादरम्यान जर तुम्हाला मळमळत असेल तर आल्याचा छोटा तुकडा तुमच्या तोंडात ठेवा. तसे केल्यास प्रवासादरम्यान मळमळणे किंवा उलटी रोखण्यास फायदेशीर ठरतात. आलं खाणे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्हाला आल्याचा चहा देखील पिऊ शकता.
4. पुदिना
पुदिन्याच्या वासानेही प्रवासादरम्यान उलटी होण्याचे टाळता येते. त्यासाठी पुदिन्याचे तेल आपल्या रुमालाला थोडे लावून प्रवासादरम्यान त्याच वास घेत राहिल्याने उलटी होण्याची चिन्हे कमी होतात. तसेच जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर त्यासाठी हे तेल फायदेशीर आहे.
5. तुळशीची पाने
प्रवासावेळी उलटी होण्यापासून बचाव करायचा असेल तर तुळशीचा पाने अवश्य खा. जेव्हा तुम्हाला उलटी होतेय असे वाटत असेल तेव्हा तुळशीची पाने दाताखाली चावा. मळमळणे कमी होईल.
प्रवासावेळी जर तुमच्याकडे उलटी थांबण्याचे औषध नसेल तर हे घरगुती उपाय उलटी थांबवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. तसेच प्रवासादरम्यान पुस्तक वाचणे किंवा मोबाईलवर सतत राहणे टाळा. तसेच प्रवासासाठी घरातून निघताना खाली पोट निघू नका. त्यामुळे उलटी होण्याची चिन्हे जास्त असतात
(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे.)