Holi First Aid Tips: होळी खेळताना रंग तोंडात, डोळ्यात गेल्यानंतर जीवावर बेतण्याआधीच काय कराल?
Safe Holi (Photo Credits: Pixabay)

Tips For Happy and Safe Holi: होळीचा सण हा वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल देतो. वसंत ऋतूमध्ये निसर्गात जशी झाडांना पालवी फूटल्याने रंग भरले जातात तसेच होलिका दहनाला (holika Dahan) सारे विनाशी विचार जाळून रंगांची उधळण केली जाते. धूळवडीदिवशी (Dhulvad) काही जण होळीच्या राखेने धूलिवंदन साजरं करतात तर काही जण रंगांची उधळण करतात. यामध्ये आबालवृद्धांना होळीच्या रंगात रंगवलं जातं. पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीने होळीचा रंग नैसर्गिक असावा असे अवाहन केले जाते. मात्र चुकून होळीचे रंग तोंडात, डोळ्यात गेल्यास नेमकी काय काळजी घेणं आवश्यक आहे हे देखील जाणून घ्या. Holi 2019: केस आणि त्वचा यावरून होळीचे रंग सुरक्षितपणे काढल्यासाठी खास '9' टीप्स

होळीचा रंग नैसर्गिक रंग असल्यास इजा होण्याचा, त्रास होण्याचा धोका कमी असतो परंतू काही अपायकारक किंवा भेसळयुक्त रंगांमुळे त्रास होत असल्यास वेळीच काळजी घ्या. Holi 2019: होळी, रंगपंचमी सणांमध्ये रंगाचा आनंद लूटताना केसांचे आणि त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी खास टिप्स!

होळीचा रंग डोळ्यात गेल्यास काय कराल?

अनेकदा जबरदस्तीने रंग फासण्याच्या नादामध्ये ते डोळ्यात जाण्याचा धोका असतो. डोळ्यात रंग गेल्यास तो चोळू नका. रंगामुळे होणारा त्रास कमी होईपर्यंत डोळा साध्या पाण्याने स्वच्छ करा. डोळ्यांवर सतत पाण्याचे हबके मारा. जळजळ होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने काही आय ड्रॉप्स डोळ्यामध्ये घाला. मॉईश्चरयझिंग आय ड्रॉप्समुळे जळजळ कमी होण्यास मदत होईल.

होळीचा रंग तोंडात गेल्यास काय कराल?

रंग तोंडात गेल्यास शक्य तितक्या लवकर गुळण्या करून तो बाहेर काढण्यास प्रयत्न करा. रंग़ विषारी किंवा भेसळयुक्त असल्यास हा प्रकार जीवावर बेतू शकतो. मळमळ, उलट्या होत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. पचायला हलके पदार्थ खावेत. तसेच होळीचा रंग लागलेले किंवा होळीच्या रंगांनी माखलेल्या हाताने कोणताही पदार्थ खाऊ नका.

होळीचा त्वचेवर, नखात रंगा गेल्यास काय कराल?

भेसळयुक्त रंगांमुळे त्वचेला त्रास होत असल्यास तत्काळ पाण्याने काढून टाका. त्यानंतर त्वचेवर तेल किंवा मॉईश्चरायझर लावा. रंगांची अ‍ॅलर्जी होऊन त्वचा लालसर होणं, पुरळ उठणं, शुष्क होणं असा त्रास होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ओटीसी औषधं घ्या. खेळताना चूकून जखम झाल्यास त्याला अ‍ॅन्टिसेप्टिकने स्वच्छ करून बॅन्डेज लावा. जखम उघडी ठेवून रंग खेळणं टाळा. हे अतिशय धोकादायक आहे.

डीहायड्रेशनपासून दूर राहण्यासाठी काय कराल?

  • सध्या सर्वत्र उन्हाचा पारा वाढला आहे. त्यामुळे उन्हात खेळत असल्यास तुम्हांला उकाड्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या. विशिष्ट वेळाने पाणी, पोटभरीचा नाष्टा करा.
  • रिकाम्यापोटी खेळायला बाहेर पडू नका. रिकाम्यापोटी भांग, थंडाई अशी पेय पिणं टाळा.
  • भरपेट खाऊन देखील नाचानाच करू नका.

(  नक्की वाचा: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, Quotes, SMS, WhatsApp Status, Wishes, GIFs आणि शुभेच्छापत्रं! )

होळीचा सण हा आनंदाचा आहे. त्यामुळे तो खेळताना स्वतःला आनंद होईल आणि ज्या व्यक्तीसोबत खेळत आहात ती व्यक्तीदेखील खूष राहील याची काळजी घ्या. प्रामुख्याने मुलींना, स्त्रियांना त्यांच्या मनाविरुद्ध रंगात रंगवू नका. तुम्हांला ही होळी आनंदाची आणि सुरक्षित जावो!