होळीचा सण काही रंगांशिवाय पूर्ण होत नाही. होळी, रंगपंचमी सणांना रंग खेळताना केस आणि त्वचेचे होणारे नुकसान लक्षात येत नाही. मात्र रंग खेळून झाल्यावर त्याचे परिणाम जाणवतात. त्यामुळे रंग खेळण्यापूर्वीच थोडी काळजी घेतली तर होळीच्या रंगांमुळे होणारे केसांचे आणि त्वचेचे नुकसान टाळता येईल. त्यात जर तुम्ही नैसर्गिक रंगांनी होळी खेळणार असाल तर फारच उत्तम. होळी, रंगपंचमी साठी नैसर्गिक रंग घरच्या घरी कसे बनवाल?
होळीचा आनंद लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वचजण घेत असल्याने थोडी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. परिक्षेचा काळ असल्याने होळीची मज्जा घेत असताना मुलांचेही कोणतेही नुकसान होऊ नये म्हणूनही काळजी घेणे महत्त्वाचे आहे. होळीच्या रंगांमुळे अनेकदा केस रुक्ष होतात, केसांची चमक नाहीशी होते. तर काही वेळेस त्वचेचे विकार होण्याचीही शक्यता असते. हे नुकसान टाळण्यासाठी काही विशेष टिप्स.... रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, Quotes, SMS, WhatsApp Status, Wishes, GIFs आणि शुभेच्छापत्रं!
हेअर केअर टिप्स:
होळी खेळायला जाण्यापूर्वी:
# केसांना तेल लावा.
# स्कार्फ किंवा कॅप घाला.
# घट्ट वेणी किंवा आंबाडा.
# हेयर सिरम / तेल लावा.
होळी खेळून आल्यावर:
# केस धुताना शाम्पूआधी कंडीशनर लावा.
# गरम पाण्याने केस धुणे टाळा.
# बेबी शॅम्यूचा वापर करा.
स्किन केअर टिप्स:
होळी खेळायला जाण्यापूर्वी:
# शरीराला तेल लावा आणि पूर्ण कपडे घाला.
# सनस्क्रीन लोशन आणि मॉईश्चरायझर लावा.
# नखांना नेलपॉलिश लावा.
# ओठांना व्हॅसलिन लावा.
होळी खेळून आल्यावर:
# रंग निघण्यासाठी त्वचा जोरजोरात घासू नका.
# सौम्य साबण किंवा बॉडी लोशनचा वापर करा.
या टिप्ससंगे सुरक्षित होळीचा आनंद घ्या आणि होळीच्या रंगामुळे त्वचेचे-केसांचे होणारे नुकसान टाळा.