
कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) 2020 हे वर्ष जरी वाईट असले तरीही यंदा ऑगस्ट महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस पडला. मात्र गेल्या 2-3 दिवसांपासून पाऊस एकाएकी नाहीसा झाला असून अचानक तापमानात (Temperature) वाढ झाली आहे. यामुळे घरात राहूनही उन्हाळ्याची झळ सोसावी लागत आहे. प्रचंड उकाडा जाणवत आहे. जर घरात राहणा-यांची ही अवस्था असेल तर घराबाहेर पडणा-यांची काय अवस्था होत असेल याची कल्पना न केलेलीच बरी. अशा स्थितीत उष्माघातापासून (Sun Stroke) स्वत:चा बचाव करणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
अचानक तापमानात झालेल्या वाढीमुळे आपल्याला उष्माघाताला सामोरे जाऊ शकते. यामुळे काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे.(Summer Tips: उन्हाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या)
1. भरपूर पाणी प्या
रोज कमीत कमी 2 लीटर पाणी पिणे गरजेचे आहे. त्यामुळे घराबाहेर असल्यास पाण्याची बाटली सोबत ठेवा. दर एक तासाने पाणी प्या.
2. रुमाल जवळ ठेवा
जर तुम्ही घराबाहेर असाल तर कायम तुमच्याजवळ रुमाल असला पाहिजे. जेणेकरुन घाम आल्यास तो पटकन पुसता येतो ज्यामुळे थकवा थोडा कमी झाल्यासारखा वाटतो.
3. ताजं अन्न खा
तापमानात वाढ झाल्यास ताजी फळे, भाज्या आणि मुख्यत: ताजे अन्न खा. शिळं अन्न खाल्ल्याने शरीरात अपचन तसेच अनय पोटासंबधीचे विकार उद्भवू शकतात.
4.मद्यपान टाळा
उन्हाळ्याच्या दिवसात अल्कोहोल किंवा सोडा या प्येयांचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण झपाट्याने कमी होतं. मद्यपानाऐवजी लिंबू सरबत, कोकम, जलजिरा यांसारखी थंड पेये पिण्याचा पर्याय निवडा.
5. थंड पाण्याने आंघोळ करा
बराच काळ घराबाहेर राहिल्यानंतर शरीरातील तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याने आंघोळ करणं केव्हाही हितावह असतं. यामुळे शरीरातील हिट कमी होते आणि तजेलपणा जाणवतो.
यासोबत घरात अथवा घराबाहेर फिक्या रंगाचे आणि हलके कपडे वापरावे. यामुळे शरीरात हवा खेळती राहते आणि थकवा जाणवत नाही. उष्माघातापासून वाचण्यासाठी या गोष्टींची काळजी घेतल्यास उन्हाचा होणारा नाहक त्रास थोडा कमी होईल.