आयुर्वेदात नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या मधाचे (Honey) अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. कोणत्याही ऋतूमध्ये दररोज केवळ 2 चमचे मधाचे सेवन केल्याने शरीर निरोगी आणि स्वस्थ राहते. थंडीच्या दिवसात मध खाल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
मध खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. अनेकजण सकाळी कोमट पाण्यात मध टाकून हे पाणी पितात. कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. चला तर मग आज या लेखातून हे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात....(हेही वाचा - Kalonji Seeds Benefits for Woman: महिलांना मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास कमी करण्यासाठी 'कलौंजी सीड्स' चा 'असा' होईल उपयोग)
पचनशक्ती सुधारण्यास मदत -
मध आणि लिंबुपाण्याचे मिश्रण पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. या मिश्रणाचे दररोज सेवन केल्याने आपली पचनशक्तीची अधिक कार्यक्षमता होते.
उत्साह वाढण्यास मदत होते -
दररोज कोमट पाणी आणि मधाचे सेवन केल्यास उत्साह वाढण्यास मदत होते. तसेच शरीराला नवी ऊर्जा मिळते. कोमट पाण्यामुळे मेंदूला रक्ताभिसरण होऊन शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. त्यामुळे मन प्रसन्न होण्यास मदत होते.
लठ्ठपणा कमी होतो -
सध्याच्या काळात अनेकांना लठ्ठपणाची समस्या जाणवत आहे. लॉकडाऊनमुळे अनेकजण घरातचं बसून आहेत. त्यामुळे शरीराची हालचाल कमी झाली आहे. दररोज सकाळी कोमट पाण्यात एक चमचा मध आणि अर्ध्या लिंबाचे सेवन केल्यान वजन कमी होण्यास मदत होते.
मूत्रमार्गाचे इन्फेक्शन दूर होते -
मध, लिंबू आणि कोमट पाण्याचे मिश्रण प्यायल्याने शरीरातील अपायकारक घटक मूत्रामार्गे शरीरातून बाहेर टाकले जातात. त्यामुळे दररोज कोमट पाण्यात लिंबू आणि मधाचे सेवन केल्यास इन्फेक्शन सारख्या समस्या दूर होतात.