Kalonji Seeds Benefits for Woman: महिलांना मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास कमी करण्यासाठी 'कलौंजी सीड्स' चा 'असा' होईल उपयोग
Kalonji Seeds (Photo Credits: Needpix, Pxfuel)

अनेकांच्या स्वयंपाकगृहात कलौंजी (Kalonji) च्या बिया वापरल्या जातात. अनेकांना प्रश्न पडला असेल की ही 'कलौंजी' म्हणजे काय? तर नीलला सतीवा, कलौंजी किंवा ब्लॅक जिमिन म्हणूनही ओळखली जाते. हे दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम आशियातील वार्षिक फूल वनस्पती आहे जे रेनुनकुलेसी कुटुंबाशी संबंधित आहे. केस गळती, हृदयविकार, मधुमेह यांसारख्या अनेक समस्यांसाठी कलौंजीचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की, याच बियांचा वापर महिलांना येणा-या मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास कमी करण्यासाठीही कलौंजीचा वापर केला जातो.

कलौंजी ही औषधी वनस्पती फूल असल्यामुळे मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास कमी होण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. मासिक पाळी दरम्यान होणारा अति रक्तस्त्राव, पोटदुखी, सफेद पानी, अशक्तपणा हा त्रास कमी करण्यासाठी कलौंजी बियांचा वापर होतो.

हेदेखील वाचा- Health Benefits of Kalonji (Black Seeds): वजन कमी करणे, केस गळती थांबवणे अशा अनेक गोष्टींवर रामबाण उपाय आहे 'कलौंजी'; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

मासिक पाळी दरम्यान 'असा' करा कलौंजी तेलाचा वापर

2 कप पाण्यात पुदिन्याची पाने टाकून ते पाणी चांगले उकळवा. त्यानंतर ते पाणी गाळून घ्या. त्यात 2 चमचे साखर आणि कलौंजीचे अर्धा चमचा तेल मिसळा. हे मिश्रण सलग 40 दिवस पिणे. फरक जाणवेल.

पोटात होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी कलौंजीचे तेल महत्वाची भूमिका निभावते. पोटाच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी, अर्धा चमचे कलौंजी तेल, काळे मीठ आणि अर्धा ग्लास कोमट पाणी घेतल्यास पोटदुखीचा त्रास बराच कमी होतो.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)