Photo Credit: Pixabay

पावसाळा जरी कडक उष्णतेपासून दिलासा देनारा असला, तरीही पाऊस येताना त्याच्या सोबत शारीरिक समस्या घेऊन येतो. पावसाळ्यात आरोग्याची नीट काळजी घेतली नाही तर आजारी पडण्याचा जसा धोका असतो तसाच धोका केसाना देखील असतो. पावसाळ्यात केसांच्या विविध समस्या निर्माण होतात. त्यामुळे पावसाळ्यात नीट केसांची काळजी घेणे हे आवश्यक आहे. केस कोरडे होणे, केसात कोंडा होणे, केस रूक्ष होणे, अशा एक ना अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे  आपण बाजारातील विविध उत्पादने वापरतो आणि त्यामुळे केस अधिकच खराब होतात.पण काळजी करु नका. कारण आज आम्ही तुमच्याकरता काही खास टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या केसाची वेवस्तीत काळजी घेऊ शकता.

टिप्स

पावसाच्या पाण्यात केस भिजवू नये:

पावसाच पानी तुमच्या केसांवर खूप चुकीचा परिणाम करू शकत. आणि मग तुम्हाला केस कोरडे होणे, केसात कोंडा होणे ह्या सारख्या समस्याचा सामना करावा लागेल. त्यामुळे पावसाच्या पाण्यात केस भिजवू नयेत आणि जर कडी ती भिजलीत तर त्यांना तसंच न सुकवता घरी आल्यावर त्यांना सवछ पाण्याने धुवून काढावे.

खोबरेल तेल:

आठवड्यातून एकदा तरी केसांना तेल लावणे हे खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला त्याचे अजून फायदे हवे असतील तर तेल लावायच्या पूर्वी त्याला थोडे कोमट से गरम कर आणि मग नंतर ते केसांवर नीट लावा. व जर तुम्हाला आजून पोषण द्यायच असेल तर त्या तेलात कडीपत्ता व मेथी दाणे टाकू शकता.

केसाननुसार शॅम्पू व कंडिशनर निवडा:

तुमच्या केसाननुसार योग्य शॅम्पू व कंडिशनर निवडण खूप गरजेच आहे. कारण पावसाळ्यात आपली केस कोरडे व रूक्ष होतात. त्यामुळे अश्या परिस्थितिमध्ये योग्य शॅम्पू व कंडिशनर वापरणे खूप गरजेचे आहेत. सोबतच शॅम्पू नंतर कंडिशनर केल्या वर केस मायक्रो फायबर टॉवेल ने सुखवा व मग केसान सीरम लावा. यामुळे तुमचे केस फ्रीजी व निस्तेज दिसण्य पासून वाचतील.

बाहेर जाताना केस बांधून जाणे:

बाहेर जाताना केस सुटते ठेवून जाणे टाळा. त्यामुळे केस कोरडे पढू शकतात व केस गळायला देखील चालू होतील. बाहेरच्या प्रदूषणा मुले व दमट वातावरण मुळे केसान वर हे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो बाहेर जाताना केस बांधून निघणे.

पौष्टिक, संतुलित आहार घ्या:

तुमच्या केसांचे आरोग्य मुख्यत्वे तुमचे अंतर्गत आरोग्य प्रतिबिंबित करते. पोषक-समृद्ध आहारामुळे केसांच्या पट्ट्या मुळांपासून मजबूत होतात आणि त्यांना आर्द्रता आणि पाऊस सहन करण्याची ताकद मिळते. त्यामुळे नेहमी पौष्टिक आहार घ्या. जे तुमच्या त्वचे व केसान साठी चांगले असतील.

 केसांचा रंग आणि हीट स्टाइलिंग टाळा:

अतिरिक्त ओलावा आणि संभाव्य नुकसान रोखण्यासाठी पावसाळ्यात केसांची काळजी घेण्याच्या रणनीतींमध्ये बदल करण्याची आवश्यकता असते. आपले केस रंगविण्यासाठी किंवा स्टाईल करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे केमिकल केस ट्रीटमेंट आणि उष्णता टाळा.

 कोंडा होण्यासाठी काळजी घ्या:

पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता आणि टाळू ओलेपणामुळे कोंडा वाढू शकतो. कडुलिंबाचे तेल , लिंबाचा रस, चहाच्या झाडाचे तेल यासारखे नैसर्गिक उपाय प्रभावी ठरू शकतात. कडुलिंबाच्या तेलाचे समान भाग गोड बदाम तेल किंवा तिळाच्या तेलाने पातळ करा आणि टाळूमध्ये हलक्या हाताने मसाज करा. 30 मिनिटे ठेवा मग नंतर धुवून टाका. नैसर्गिकरित्या कोंडा दूर करण्यासाठी स्वच्छ धुवा.