Tips to avoid hangover: थर्टी फर्स्ट म्हटलं तर दारु ही आलीच असे समीकरण बनवलेल्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असा लेख आहे. नववर्षाचे स्वागतासाठी मद्यप्रेमींनी एव्हाना आपली मद्याची सोय करुन ठेवली असेल. 31st डिसेंबरची रात्र गाजविण्यासाठी मनसोक्त मद्यपान करणे हे आज अनेकांचे लक्ष्यच असेल जणू. अशा वेळी अनेकांचा स्वत:वरचा ताबा सुटतो आणि नकळतपणे त्यांच्याकडून जास्तीत जास्त प्रमाणात मद्यपान केले जाते. अशा वेळी त्यांना अति मद्यसेवनाचे हँगओव्हर होते. त्यात मळमळणे, उलट्या होणे डोकं जड होणे यांसारखे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. अशा लोकांना मद्यपानाचा त्रास होऊ नये म्हणून आज मद्यपान करण्यापूर्वी काही विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
म्हणूनच की काय 1 जानेवारी हा दिवस हँगओव्हर दिन म्हणून साजरा केला जातो. मद्यपानामुळे लोकांना त्याचे हँगओव्हर होऊ नये यासाठी काही ठराविक गोष्टी करणे आवश्यक आहे.
1. पुरेसे अन्न खा
सुरुवातीला मद्यपान करण्यापूर्वी शरीरात थोडं अन्न गेल्याने अतिशय हळू हळू रक्तात मिसळते. मात्र न खाता रिकामी पोटी दारू प्यायल्याने ती जलद रित्या रक्तात मिसळते.
2. मदयपान करताना मधे मधे पाणी प्या
दोन शॉट्सच्या मध्ये ग्लासभर पाणी पित राहा. जेणे करुन दारूचा परिणा तुमच्या यकृतावर होणार नाही. राशी भविष्य 31 डिसेंबर 2019: वर्षाचा अखेरचा दिवस कोणत्या राशीसाठी असणार खास? पहा आजचे राशीनुसार भविष्य
3. केळं खा
हॅंगओव्हरपासून बचावासाठी मद्यपान करण्यापूर्वी काही वेळ आधी केळे खा. यातील पोटॅशियम, कार्बोहायट्रेड शरीराला रिहाईड्रेट ठेवतात.
4. मद्यपानाच्या प्रकाराप्रमाणे त्याचे सेवन करा
बिअरचे शॉट्स तुम्ही शक्य तितक्या पटकन घेऊ शकता. मात्र दारूमध्ये सर्वात जास्त नशा असल्यामुळे ती हळूहळू झेपेल तेवढीच घ्यावी.
5. डाएट कॉकटेल्स
शक्यतो डाएट कॉकटेल्स पिणे टाळा. त्यात फळांचा रस आणि अल्कोहोल या दोघांचेही मिश्रण असल्याने त्याची नशा लवकरच चढण्याची शक्यता जास्त असते.
शेवटी अर्थात कोणती ड्रिंक प्यावी आणि कोणती पिऊ नये हा ज्याचा त्याचा आवडीचा प्रश्न आहे. मात्र त्याचे सेवन करताना त्याची झिंग चढू नये यासाठी शक्य तितकी काळजी घेणे गरजेचे आहे.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)