Zodiac (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

31 डिसेंबर 2019 म्हणजेच ग्रेगरियन कॅलेण्डर प्रमाणे वर्षाचा शेवटचा दिवस. आज एका वर्षाला निरोप देत उद्यापासून नवी सुरुवात करण्याची संधी आहे, या संधीचा पुरेपूर वापर करताना तुम्हाला तुमच्या ग्रहांचा अडथळा येऊ नये यासाठी राशिभविष्य आणि त्यानुसार तुम्ही करण्याच्या व न करण्याच्या गोष्टी एकदा तपासून पहा. आज अनेक जण वेगवेगळ्या पार्ट्या प्लॅन करता असतील यावेळी थोडे काळजीपूर्वक वागणे महत्वाचे आहे, जीव धोक्यात घालून सेलिब्रेशन करण्याचा मोह आवरा. याशिवाय तुमची आर्थिक, मानसिक व कौटुंबिक स्थिती कशी असेल हे जाणून घेण्यासाठी चला तर पाहुयात मंगळवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष: आजच्या दिवशी कोणतेही नवीन कार्य करु नका. बाहेर प्रवासाला जाण्याचे टाळा. त्याचसोबत वाद-विवाद टाळावे. मानहानिचा योग संभवतो. तर कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका.

शुभ उपाय- कोणाचे ही उष्ट अन्न खाऊ नका.

शुभ दान- लाल रंगाच्या कपड्याचे वस्रदान करावे.

शुभ अंक- 2

शुभ रंग- गुलाबी

वृषभ: आजच्या दिवसाची तुमची सुरुवात ही फारशी उत्तम होणार नाही. पैसे जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. महिलांशी भांडण करणे टाळा आणि वेळेचा सदुपयोग करा.नोकरीसाठी आजचा दिवस उत्तम राहील.

शुभ उपाय- गाईला गुळाच्य चपातीचा नैवद्य दाखवा.

शुभ दान- धार्मिक पुस्तकाचे दान करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- केशरी

मिथुन: या राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवस संमिश्र पद्धतीचा असेल. कामात चुका होतील परंतु नीट लक्ष देऊन केल्यास ती पूर्ण करता येतील. आई-वडिलांची साथ लाभेल. बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची गोष्ट कळेल.

शुभ उपाय- वडाच्या झाडाला पाणी घाला.

शुभ दान- भुकलेल्यांना अन्न दान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- करडा

कर्क: आजच्या दिवशी कर्क राशीतील व्यक्तींना धनलाभ होणार आहे. परंतु आजारपणावर पैसे खर्च होण्याची शक्यता जास्त आहे. व्यापारधंद्यातील मंडळींचे थकीत पैसे परत मिळणार. मात्र कोणत्याही कामातील निर्णय घाईमध्ये घेणे टाळा.

शुभ उपाय- भगवान शंकराची उपासना करा.

शुभ दान- मंदीर उभारणीच्या कामात मदत करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- पिवळा

सिंह: सिंह राशीतील व्यक्तींनी आजच्या दिवशी प्रकृतीकडे जास्त लक्ष द्या. नोकरीत आपल्या कामाचे कौतुक केले जाईल. घरातील मंडळींशी आदराने वागा. मित्रपरिवाराशी गाठभेट होईल. प्रिय व्यक्तीसोबत वाद घालणे टाळा.

शुभ उपाय- कुबेर मंत्राचे पठन करा.

शुभ दान- फळ दान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- निळा

कन्या: कन्या राशीतील मंडळींनी आज गोड शब्दात दुसऱ्यांची वागा. सर्व कामे पूर्ण होतील. प्रकृती उत्तम राहील. घरातील वातावरण उत्साही राहील. प्रिय व्यक्तीसोबत खास दिवस जाईल. पैसे खर्च करताना विचार करा.

शुभ उपाय- लक्ष्मीची पूजा करा.

शुभ दान- लाल झेंडा किंवा नारळ दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- पोपटी

तुळ: आज तुम्हाला ऑफिसातील किंवा इतर मंडळींच्या सहवासामुळे तुमच्यावरील ताण कमी होऊन त्यांची साथ लाभणार आहे. कोणत्यातरी जुन्या मित्र-मैत्रिणी सोबत गाठभेठ होऊ शकते. आजच्या दिवशी केलेले कार्य पूर्णत्वास जाईल. परंतु तुम्ही जास्त भाऊक राहाल.

शुभ उपाय- अर्धा कप फिके दुध प्या.

शुभ दान- गरजूंना अंथरुण दान करावे.

शुभ अंक- 5

शुभ रंग- जांभळा

वृश्चिक: तुमचा राग एखाद्या संकटात पाडू शकतो. त्यामुळे इतरांशी वाद घालणे टाळा. पैसे जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. घरातील कामांचा व्याप वाढेल. तसेच मित्रपरिवारासह वेळ घालवाल. प्रिय व्यक्तीशी तुमचे भांडण होऊ शकते.

शुभ उपाय- गुळ घाऊन बाहेर जा.

शुभ दान- लाल रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- सफेद

धनु: आज तुमच्या जवळ राहिलेली कामे करण्यासाठी वेळ असेल. त्यामुळे कामात घाईगडबड न करता कामे पूर्ण कशी होतील याकडे जास्त लक्ष द्या. प्रिय व्यक्तीशी आदराने वागा. आई-वडिलांची साथ लाभेल. नोकरीच्या ठिकाणी सावधगिरीने वागा.

शुभ उपाय- गाईला चारा द्या.

शुभ दान- भुकेल्यांना जेवण द्या.

शुभ अंक- 2

शुभ रंग- सोनेरी

मकर: मकर राशीतील व्यक्तींना आज नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्ती मात्र तुमच्या वागण्यामुळे खुश नसेल. मात्र भांडण करणे टाळा.

शुभ उपाय- कुलस्वामिनीची उपासना करा.

शुभ दान- मंदिर उभारणीच्या कामात मदत करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- आकाशी

कुंभ: आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. थोडा अशक्तपणा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित वाटेल.

शुभ उपाय- कुत्र्याला जेवण द्या.

शुभ दान- गरजूंना अंथरुण दान करावे.

शुभ अंक- 3

शुभ रंग- लाल

मीन: या राशीतील व्यक्तींनी आज अतिरिक्त खर्च होण्यापासून दूर रहावे. तसेच राहिलेली कामे आजच्या दिवशी पूर्ण केल्यास उत्तम. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम नसेल पण आरोग्य उत्तम राहील. जवळीकच्या व्यक्तीसोबत भांडण होण्याची शक्यता आहे.

शुभ उपाय- घरातील वयोवृध्द व्यक्ती असेल तर छानसे एक गिफ्ट द्या.

शुभ दान- रक्तदान करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- हिरवा