![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/07/common-cold-treatment-784x441-380x214.jpg)
पावासाळ्यात आजार, इंन्फेक्शनचा धोका वाढतो. त्यातच जर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर आजार लवकर बळावतात. कमजोर रोगप्रतिकारशक्तीमुळे आजारांशी सामना करण्याची तुमची शक्ती आणि मेटॅबॉलिक रेटही मंदावतो परिणामी पचनशक्तीही कमकुवत होते. यामुळे बद्धकोष्ठता, गॅसचे विकार उद्भवण्याची शक्यता असते म्हणूनच पावसाळ्यात कमी होणारी रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी या नैसर्गिक उपायांचा नक्की वापर करून पहा...
1. मध आणि लिंबाचा रस पचन सुधारण्यास मदत करतो. तसेच आतड्यांचे कार्य सुधारण्यास मदत होते. परिणामी शरीर निरोगी राहते.
2. पावसाळा म्हणजे भजीचा बेत आलाच. पण असे पदार्थ पचायला जड असल्याने या दिवसांत ते टाळलेलेच बरे! पण अगदीच खायचे झाल्यास ऑलिव्ह किंवा मक्याच्या तेलाचा वापर करा. राईसारखी जड तेलं वापरणं टाळा.
3. पावसाळ्यात वातावरणात वाढणारी आर्द्रता आपल्याला अधिक कमजोर बनवते. घामामुळे आपण डी-हायड्रेटेड होतो. म्हणूनच या दिवसात थकवा टाळण्यासाठी पाणी, ग्रीन टीचे नियमित पुरेसे सेवन करा.
4. हळद, मेथीचे दाणे असे नैसर्गिकरित्या अॅन्टिबायोटिक असणार्या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होईल. तसेच मेटॅबॉलिक रेटही सुधारेल. याचबरोबर आलं व लसूणही आहारात ठेवणे हितकारी आहे.
5. ओट्स, ब्राऊन राईस सारखे फायबरयुक्त पदार्थांचा आहारात अधिक समावेश करा. तसेच अलूबुखार सारख्या पावसाळ्यात मुबलक मिळणार्या फळांचा तसंच पावसाळी भाज्यांचा या दिवसांत आस्वाद घ्या.
तर यंदा पावसाळ्यात आजार, इंन्फेक्शन टाळण्यासाठी या टिप्स नक्की ट्राय करुन पहा.
(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे.)