Covid-19, Dengue (PC - pixabay)

Covid-19 vs Dengue: गेल्या काही महिन्यांत देशातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. अलीकडील अहवालांनुसार, लोकांना डेंग्यू आणि कोविड -19 संसर्ग समजणे कठीण होत आहे. ज्यामुळे उपचारांनाही विलंब होत आहे. ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे या दोन आजारांमधील फरक समजून घेणे गरजेचे आहे. डेंग्यू हा चार प्रकारच्या विषाणूंमुळे होतो, तर कोविड-19 हा SARS-CoV-2 व्हायरसमुळे होतो. खोकला, शिंकणे, संक्रमित व्यक्तीशी बोलणे याद्वारे कोविडचा प्रसार होऊ शकतो. दुसरीकडे, डेंग्यू हा एडिस इजिप्ती डासाच्या चावण्यामुळे होतो. या दोन्ही आजारांची काही लक्षणे अगदी सारखीच आहेत, जसे की शरीरदुखी, स्नायू दुखणे, थंडी वाजून येणे, ताप आणि मळमळ.

कोविड-19 आणि डेंग्यूमध्ये ताप हे एक सामान्य लक्षण आहे. तथापि, या दोन संक्रमणांच्या तापामध्ये फरक आहे. सामान्यतः कोविडमध्ये येणारा ताप हा सौम्य दिसतो, जो 102 पर्यंत पोहोचू शकतो. तसेच तो सामान्य तापाचे औषधाने कमी केला जाऊ शकते. दुसरीकडे, डेंग्यूच्या संसर्गामध्ये जास्त ताप असतो, जो 103 ते 105 पर्यंत जाऊ शकतो. त्यासाठी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे. याशिवाय कोविडमध्ये येणारा ताप सतत येत राहतो. तर डेंग्यूचा ताप कायम राहतो. त्यामुळे कोविड-19 आणि डेंग्यूमधील फरकही ताप कोणत्या प्रकारचा आहे हे समजू शकते. (हेही वाचा - Cardiac Arrest Cases in Mumbai: मुंबईतील 18-40 वयोगटातील तरुणांमध्ये वाढतोय कार्डियक अरेस्टचा धोका; गेल्या सहा महिन्यात 17 हजार 880 जणांचा मृत्यू)

दोन्ही संसर्गाच्या लक्षणांमधील फरक कसा समजून घ्यावा?

कोविड आणि डेंग्यूची अनेक लक्षणे सारखी असली तरी त्यांची दिसण्याची वेळ वेगळी आहे. यूएस सीडीसीनुसार, डेंग्यूची लागण झाल्यानंतर तुम्हाला 3 ते 10 दिवसांत लक्षणे दिसू लागतात, तर कोविड-19 मध्ये 5 ते 7 दिवसांत लक्षणे दिसू लागतात. याशिवाय या दोघांच्या सुरुवातीच्या लक्षणांवरूनही फरक ओळखता येतो. उदाहरणार्थ, कोविड संसर्ग एका वेळी एक किंवा अधिक लक्षणांसह सुरू होऊ शकतो, जो व्यक्तीपरत्वे बदलू शकतो. तथापि, डेंग्यूची सुरुवात सहसा डोकेदुखी किंवा अशक्तपणाने होते.

कोविड आणि डेंग्यूच्या गंभीर संसर्गामध्ये काय फरक आहे?

सीडीसीच्या मते, डेंग्यूच्या बाबतीत, रोग गंभीर झाल्यास, प्लाझ्मा गळतीस कारणीभूत ठरतो. ज्यामुळे शरीर शॉकमध्ये जाते, द्रव जमा होतो, थ्रोम्बोसाइटोपेनियासह गंभीर रक्तस्त्राव होतो. हृदय आणि अवयवांना समस्या येतात. गंभीर नुकसान होते.

कोविड-19 मधील गंभीर आजाराची लक्षणे -

  • श्वास घेण्यात अडचण
  • हायपोक्सिया
  • श्वसनसंस्था निकामी होणे
  • अनेक अवयव निकामी होणे

सुरक्षित कसे राहायचे

कोविड-19 टाळण्यासाठी मास्क घालणे खूप महत्वाचे आहे, जेणेकरून व्हायरस पसरण्यापासून रोखता येईल. याशिवाय, शारीरिक अंतर, हाताची स्वच्छता आणि लसीकरण करून तुम्ही गंभीर संसर्ग टाळू शकता. डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी, मच्छर प्रतिबंधक, पूर्ण बाह्यांचे शर्ट, पूर्ण पॅन्ट घाला आणि स्वच्छता राखा. घराभोवती पाणी साचू देऊ नका. साचलेल्या पाण्यात मलेरिया आणि डेंग्यूच्या डासांची पैदास होते.