Covid-19 संसर्गामुळे महिलांपेक्षा पुरुषांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक? तुर्कीतील संशोधकांच्या अभ्यासातून समोर आले 'हे' कारण
Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गामुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती समोर येत आहे. संशोधक यामागील कारणाचा अभ्यास करत आहेत. तुर्कीच्या संशोधनकांनी अलिकडेच केलेल्या एका संशोधनातून असे दिसून आले की, SARS-CoV-2 व्हायरसमध्ये पुरुषांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनची (Testosterone) पातळी कमी करण्याची क्षमता असते. टेस्टोस्टेरॉनच्या कमी प्रमाणामुळे कोविड-19 चा संसर्ग झालेल्या रुग्णांना अधिक धोका असतो. कोरोना व्हायरस संसर्गामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक असण्याचे कारण टेस्टोस्टेरॉनचे कमी प्रमाण असू शकते, असे या थेअरीतून समोर आले आहे.

तुर्कीमधील University of Mersin, and the Mersin City Education and Research Hospital च्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, अभ्यासासाठी जमा केलेल्या सर्व डेटा मधून असे प्रतित होते की, SARS-CoV-2 ची लागण झालेल्या पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. आयसीयू पेशन्ट्समध्ये टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी असणे त्यांच्या जीवासाठी खूप धोक्याचे आहे, अशी माहिती एजिंग मेल जर्नलमधून समोर आली आहे.

या पुढील अभ्यात असे आढळून आले की, SARS-CoV-2 ची लागण झालेल्या पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची ट्रिटमेंट केल्यास त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येते. असा अहवाल सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला हाती आला आहे. (कोरोना व्हायरस चा तुमच्या हृदयावर परिणाम होतो का? जाणून घ्या काय आहे रिपोर्ट)

टेस्टोस्टेरॉन हा पुरुषांमधील सर्वात महत्त्वाचा सेक्स हार्मोन आहे. वयाच्या चाळीशीनंतर हा हार्मोनमध्ये 0.8-2% घट होण्यास सुरुवात होते. त्यामुळे वयाने अधिक असलेल्या पुरुषांमध्ये कोरोना व्हायरस संसर्गामुळे प्रकृती खालवण्याची शक्यता अधिक असते.

टेस्टोस्टेरॉन हा मानवी शरीरातील श्वासोच्छवास करणाऱ्या अवयवांच्या रोगप्रतिकारकशक्तीशी निगडीत असतो. या हार्मोनचे प्रमाण कमी झाल्यास श्वासोच्छवास करणाऱ्या अवयवयांमध्ये इंफेक्शन होण्याची शक्यता दाट असते, असे युरोलॉजीचे प्राध्यापक आणि आघाडीच्या लेखक Selahittin Çayan यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आयसीयूमध्ये असलेल्या पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन प्रमाण कमी होणे अत्यंत धोकादायक असते. टेस्टोस्टेरॉनची ट्रिटमेंट केल्यास त्या व्यक्तीला कोविड-19 पासून वाचवण्यास यश येऊ शकते. दरम्यान, भारतात कोविड-19 संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांपैकी पुरुषांचे प्रमाण 69% होते.