Coronavirus Outbreak: कोविड च्या काळात 'हे' 5 पदार्थ तुमची रोग प्रतिकार शक्ति वाढवून तुम्हाला ठेवतील कोरोनाच्या संक्रमणांपासून दूर
Photo Credit: Pixabay

पौष्टिक आहार आणि चांगल्या प्रकारे कार्य करणारी रोगप्रतिकारक तर आपल्या शरीराला काहीच हानी होऊ शकत नाही. आपल्याकडे निरोगी रोगप्रतिकारक शक्ती असल्यास, आपले शरीर कोणत्याही रोगापासून वाचवू शकते, अगदी कोरोनाव्हायरस किंवा कोविड-19 पासून ही. आत्तापर्यंत, कोविड -19 पासून तुमचे रक्षण करण्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नव्हती किंवा घरगुती उपचार देखील उपलब्ध न्हवते पण आता असे काही जीवनसत्त्वे आणि पदार्थ आहेत जे आपण आपल्या आहारात एक मजबूत रोगप्रतिकारक प्रणाली बनवू शकता आणि तुम्ही संसर्गजन्य विरूद्ध लढा देऊ शकता. क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट लव्हनीत बत्रा यांनी प्रतिकारशक्ती वाढविणार्‍या पदार्थांची यादी आपल्याबरोबर शेअर केली आहे. पाहूयात काय आहेत ते पदार्थ. (Turmeric Water Benefits: कोविडच्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी वरदान ठरेल हळदीचे पाणी; जाणून घ्या अधिक फायदे)

दही

दही एक नैसर्गिक प्रोबायोटिक आहे आणि आपल्या शरीरात चांगल्या बॅक्टेरिया तयार करण्यास मदत करते. पण लक्षात ठेवा, हे ताजे असणे गरजेचे आहे. क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट लव्हनीत बत्रा म्हणतात की, कारणाकडे दुर्लक्ष करून जर तुम्हाला घशात खवखवत असेल तर दही खाण्याने ते वाढू शकते परंतु रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आपल्याला प्रोबायोटिक्सची आवश्यकता असते.आणि ते दह्यातून मिळते.

हळद

हळदीचे पाणी रोगप्रतिकारक शक्ती त्वरित मजबूत करते. फ्लू, बॅक्टेरिया, सर्दी यासारख्या हंगामी रोगांशी लढा देण्याचे सामर्थ्य आहे. हे विशेषतः थंड हवामानात खाणे चांगले आहे कारण यावेळी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. अशा परिस्थितीत हळदचे गरम पाणी खूप उपयुक्त आहे. थंडीत बरेच विषाणूंचा सहज हल्ला होण्याचा धोका असतो, ज्यामुळे त्यांच्याशी लढायला मदत होते.

नैसर्गिक अँटी-व्हायरस खाद्यपदार्थ

व्हायरस फूड्स तुळशीची पाने, चक्री फूल (Star Flower - Masala), लसूण आणि आले ही नैसर्गिक अँटी-व्हायरस खाद्यपदार्थ आहेत ज्यामुळे ठराविक ऋतुमध्ये होणाऱ्या आजारांपासून हे आपले संरक्षण करतात. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आणि विषाक्त पदार्थ शरीरातून बाहेर टाकण्यासाठी, या पदार्थांचा वापर गरम पाण्यात उकळून केला जातो.तुम्ही गरम पाण्यात तुळशीची पाने टाकून ते ही पिऊ शकता किंवा आल्याचा रस चे ही सेवन करू शकता.त्याच बरोबर लसाणाचा तुकडा ही क्रश करुन खाऊ शकता.

जीवनसत्त्वे (Vitamins)

सर्व प्रकारच्या जीवनसत्त्वेंपैकी एखाद्याची प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि व्हिटॅमिन डी (Vitamin D) ही प्रमुख भूमिका बजावतात. त्यासाठी,आवला , लिंबू, संत्र इतर सारख्या आम्ल फळे आणि भाज्या जास्त प्रमाणात असाव्यात. तसेच अंडी अंड्यातील पिवळ बलक आणि मशरूम हे व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत आहेत.

कोविड -19  मध्ये संसर्ग झालेल्या लोकांना IV  (Intravenous therapy) च्या माध्यमातून व्हिटॅमिन सी दिली जात आहे - ज्यामुळे द्रवपदार्थ थेट शिरामध्ये पोहोचतात असे ही लव्हनीत बत्रा म्हणाल्या. तसेच रोज ताज्या आवळ्याचा रस (30 मि.ली.) पिण्याची सूचना ही त्या देतात.

(टीप- या लेखात दिलेल्या सर्व माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आम्ही याचा दावा करीत नाही की, लेखात दिलेली माहिती तुमच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरेल. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांशी सल्लामसलत करा)