CCHF Origin, Disease, Symptoms: पालघर जिल्ह्यात क्रायमिन काँगो (Crimean Congo Fever) तापाचे नवे आव्हान उभे ठाकले आहे. सर्वसाधारणपणे हा आजार जनावरांमध्ये आढळतो. परंतू, गोचीड, डास, पिसवा, गोमाशा आदिंच्या माध्यमातून या तापचा मानवालाही संसर्ग होतो. गुजरातमध्ये काही ठिकाणी असा संसर्ग झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. गुजरातमधील जनावरांनाही हा आजार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. गुजरातमधून हा आजार सीमा प्रदेशातून महाराष्ट्रात येऊ नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. योग्य काळजी आणि वेळीच उपचार घेतल्यास Crimean Congo Fever आजारापासून बचाव करता येतो. Crimean Congo Fever आजार, लक्षणे आणि उपाययोजना घ्या जाणून.
मृत्यूचे प्रमाण 9 ते 30%
प्राप्त माहितीनुसार, वेळीच योग्य ते उपचार केल्यास या तापात कोणताही धोका उद्भवत नाही. परंतू, जर याकडे दुर्लक्ष केले तर रुग्ण दगावण्याची शक्यता वाढते. या आजारात रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाण 9 ते 30% इतके आहे.
हायलोमा गोचिडापासून उत्पत्ती
काँगो ताप (Crimean Congo Fever ) प्रामुख्या्ने झुनोटिक स्वरुपाचा आहे. या वासाची उत्पत्ती नैरो व्हायरस (Nairovirus) पासून होते. हायलोमा (Hyloma) नावाचा गोचिड, डास, पिसवा या प्रामुख्याने जनावरांना चावतात. याच गोचड्या, पिसवा, डास पुढे मानवाला चावल्यास या आजाराचा संसर्ग मानवालाही होतो, असे अभ्यासक सांगतात. (हेही वाचा, CCHF: पालघर जिल्ह्यात Crimean Congo Fever आजाराचे नवे आव्हान, प्रशासन सतर्क)
जगभरातही Congo Fever आल्याच्या घटना
केवळ गुजरात किंवा पालघरमध्येच नव्हे तर जगभरातही Congo Hemorrhagic Fever आल्याची माहिती उपलब्ध आहे. प्रामुख्याने या आधी दक्षिण आफ्रिका, चीन, हंगेरी, कांगो, इराण, बल्गेरिया आदी देशांमध्ये मानवाला जनावरांपासून या आजाराचा संसर्ग झाल्याचे आढलून आले आहे.
सुरक्षीततेचा उपाय
जनावरांचे गोटे स्वच्छ ठेवावेत. गोठ्यात अथवा जनावरांच्या पाठीवर, कासेमध्ये, गुप्तांगामध्ये गोचिड, डास, गोमाशा, पिसवा असल्यास त्याचे निर्मूलन करावे. गोचीड, डास आणि पिसवांचे निर्मूलन करणे, ते चावणार नाही याची दक्षता घेणे, गोठ्याची नियमित फवारणी, तसेच जनावरांच्या अंगावरील गोचीड हाताने न फोडणे. मानवास या आजाराची लागण झाल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे. कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष न करता, कोणतेही दुखणे अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घेणे. घरगुती, गावटी उपायांपासून स्वत:ला दूर ठेवणे. ऐकीव माहितीवर कोणताही विश्वास न ठेवणे.
Congo Fever लक्षणे
-
- तीव्र डोकेदुखी
- अती प्रमाणात ताप
- सांधेदुखी
- पोटदुखी
- उलटी होणे
- डोळे लाल होणे
- घशामध्ये आणि तोंडामध्ये लाल ठिपके
आजार बळावल्यास दिसणारी लक्षणे
- त्वचेखाली व नाकातून रक्तस्राव
- लघवीवाटेदेखील रक्तस्राव
- काविळासारखी लक्षणे (काही लोकांमध्ये)
दरम्यान, हा आजार होऊ नये म्हणून इतरही काळजी घेणे गरजेचे आहे. प्रामुख्याने गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आदी प्रकारच्या प्राण्यांमधून या आजाराची मानवाला लागण होते. त्यामुळे या प्राण्यांच्या थेट अथवा कधीतरी संपर्कात येणाऱ्या नागरिक/डॉक्टर यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. जे लोक कत्तलखाण्यात काम करतात काम करतात त्यांनीही जनावराचे रक्ताचा संपर्क येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांनी जनावरांच्या लसीसाठी वापरलेल्या सुया, सिरीज, हॅण्डग्लोव्हज नष्ट करणे आवश्यक आहे.