Congo | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचा धोका कायम असतानाच पालघर (Palghar) जिल्ह्यात क्रायमिन काँगो (Crimean Congo Fever) तापाचे नवे आव्हान उभे ठाकले आहे. प्रामुख्याने हा ताप जनावरांमध्ये आढळतो. मात्र, आता त्याचा संसर्ग मानवी शरीरालाही होऊ लागल्याच्या घटना पुढे येत आहेत. गुजरातमध्ये अशा प्रकारच्या काही घटना आढळल्या आहेत. गुजरातमधील जनावरांनाही हा आजार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. गुजरातमधून हा आजार सीमा प्रदेशातून महाराष्ट्रात येऊ नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. पालघर पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रशांत डी कांबळे यांनी एक परिपत्रक काढून प्रशासनाला त्याबाबत सूचना दिल्या आहेत.

पशूसंवर्धन विभागाने दिलेल्या एका माहितीत म्हटले आहे की, गुजरातमधील काही भागात नागरिकांना या तापाची लागण झाली आहे. वेळीच योग्य ते उपचार केल्या या तापात कोणताही धोका उद्भवत नाही. परंतू, जर याकडे दुर्लक्ष केले तर रुग्ण दगावण्याची शक्यता वाढते. या आजारात रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाण 9 ते 30% इतके आहे. (हेही वाच, CCHF: Crimean Congo Fever उत्पत्ती, आजार, लक्षणे आणि सुरक्षीतता)

केवळ गुजरात किंवा पालघरमध्येच नव्हे तर जगभरातही Congo Hemorrhagic Fever आल्याची माहिती उपलब्ध आहे. प्रामुख्याने या आधी दक्षिण आफ्रिका, चीन, हंगेरी, कांगो, इराण, बल्गेरिया आदी देशांमध्ये मानवाला जनावरांपासून या आजाराचा संसर्ग झाल्याचे आढलून आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात अद्याप तरी या आजाराचा शिरकाव झाला नाही. याचा अर्थ हा अजार महाराष्ट्रात येणारच नाही असा नाही. त्यामुळे प्रशासन सतर्क आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने सावधगिरीचा उपाय म्हणून योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना शेतकरी आणि पैशुवैद्यकांना दिल्या आहेत.