Vladimir Putin | (Photo Credits: Wikimedia Commons)

Cancer Vaccines: जगातील विज्ञानाच्या प्रगतीसमोर ‘कर्करोग’ (Cancer) हे सर्वात मोठे आव्हान आहे. अनेक दशकांपासून शास्त्रज्ञ कर्करोगावर मात करण्यासाठी काम करत आहेत, परंतु आजपर्यंत त्यांना कर्करोगाची लस बनवण्यात यश आलेले नाही. आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russia President Vladimir Putin) यांनी मोठी घोषणा केली असून, रशिया कर्करोगाची लस (Cancer Vaccines) बनवण्याच्या अगदी जवळ आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, रशियन शास्त्रज्ञ कर्करोगाची लस बनवण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. जर सर्व काही ठीक झाले तर ती लवकरच रुग्णांसाठी उपलब्ध होईल.

पुतीन म्हणाले, ‘आम्ही नवीन पिढीसाठी कर्करोगाची लस आणि इम्युनोमोड्युलेटरी औषध बनवण्याच्या अगदी जवळ आलो आहोत. मला खात्री आहे की ही लस कर्करोगाच्या उपचारात खूप प्रभावी सिद्ध होईल.’ इम्युनोमोड्युलेटर्स ही अशी औषधे आहेत जी तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये काही बदल करतात ज्यामुळे रुग्णाला कोणत्याही रोगाशी लढण्यासाठी अधिक मदत मिळते. मात्र, रशियाने बनवलेली लस कोणत्या प्रकारच्या कर्करोगासाठी आहे आणि ती कशी कार्य करेल हे पुतीन यांनी स्पष्ट केले नाही.

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, जगातील अनेक देश आणि कंपन्या कॅन्सरची लस बनवण्यात गुंतलेले आहेत. गेल्या वर्षी ब्रिटिश सरकार आणि जर्मन बायोटेक कंपनी यांच्यात लसीबाबत करार झाला होता. याअंतर्गत त्याची क्लिनिकल ट्रायल सुरू होत आहे. अलीकडेच त्याची तिसरी चाचणी सुरू झाली आहे. या चाचणीत कमीत कमी दुष्परिणाम झाल्याचा कंपनीचा दावा आहे. कंपनीने 2030 पर्यंत 10 हजार रुग्णांवर कर्करोगाच्या लसीची चाचणी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. (हेही वाचा: Heart Attack Patient's Miraculous Recovery: शस्त्रक्रियेशिवाय, आयुर्वेदिक थेरपीने बरा झाला हृदयविकाराचा रुग्ण; 90% ब्लॉकेजेस झाले कमी, जाणून घ्या सविस्तर)

फार्मास्युटिकल कंपन्या मॉडर्ना आणि मर्क अँड कंपनी देखील प्रायोगिक कर्करोगाच्या लसी विकसित करत आहेत. सध्या ते मध्यावस्थेत आहे. दरम्यान, कर्करोग हे जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. 2020 मध्ये या आजारामुळे 1 कोटीहून अधिक मृत्यू झाले आहेत. अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यांची नोंदही झाली नाही. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्रामच्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये एकट्या भारतात कॅन्सरची सुमारे 14 लाख नवीन प्रकरणे आढळली आणि सुमारे 9 लाख लोकांनी या आजारामुळे आपला जीव गमावला.