Heart Attack Patient's Miraculous Recovery: भारतीय आयुर्वेद (India's Ayurveda) आता हृदयविकाराच्या झटक्यालाही (Heart Attack) पराभूत करण्यासाठी सज्ज आहे. भारतात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत आहे. हृदयातील ब्लॉकेजमुळे हृदयविकाराचा झटका येतो. या ब्लॉकेजवर उपचार करण्यासाठी डॉक्टर शस्त्रक्रियेचा सल्ला देतात, परंतु दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदच्या डॉक्टरांनी आयुर्वेदिक पद्धतीनेच हृदयविकाराच्या रुग्णावर उपचार केले आहेत, ज्यात 90 टक्के ब्लॉकेज होते.
धमनीमध्ये 90 टक्के ब्लॉकेज असलेला रुग्ण शस्त्रक्रियेशिवाय आणि केवळ आयुर्वेदिक औषध आणि उपचाराने बरा झाला आहे. आतापर्यंत ॲलोपॅथीवर अवलंबून असणा-या हृदयरुग्णांसाठी ही आनंदाची बातमी आहे. अशा रुग्णांना आता आयुषच्या या पारंपरिक उपचार पद्धतीद्वारेही उपचार मिळू शकतात.
एआयआयएने दिलेल्या माहितीत असे सांगण्यात आले की, 50 वर्षीय अवधेश कुमार हे दिल्लीतील जैतपूरचे रहिवासी असून ते ऑटोचालक आहेत. नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि अँजिओग्राफीमध्ये त्यांच्या धमनीत 90 टक्के ब्लॉकेज असल्याचे दिसून आले. दिल्लीतील एका प्रसिद्ध सरकारी रुग्णालयात अनेक महिने उपचार सुरू असताना, त्यांना दोन स्टेंट घालण्याचा सल्ला देण्यात आला. पुढे ऑक्टोबर 2023 मध्ये ते दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत उपचारासाठी पोहोचले.
अवधेश यांना 15 दिवस आयुर्वेद संस्थेत दाखल करून पंचकर्मासह आयुर्वेदिक उपचार पद्धतींनी उपचार करण्यात आले. त्यानंतर 3 महिने घरीच राहून त्यांना आयुर्वेदिक औषधे खायला देण्यात आली. आता पुन्हा एकदा अँजिओग्राफी केली असता 0-5 टक्के ब्लॉकेज समोर आले. (हेही वाचा: mRNA Cancer Vaccine Trial: कॅन्सर वरील उपचारांमध्ये आता 'mRNA'लस संजीवनी ठरणार? UK मध्ये ट्रायल्स सुरू)
या संदर्भात रुग्ण अवधेश कुमार यांनी सांगितले की, हृदयविकाराच्या झटक्यावरील उपचारानंतर 3 महिन्यांनी त्यांना स्टेंट घालण्यास सांगितले होते, परंतु त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे ते अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत पूर्णपणे मोफत उपचारासाठी आले. येथे 15 दिवस आणि नंतर घरी 3 महिन्यांच्या उपचारानंतर ते पूर्णपणे निरोगी असून, अँजिओग्रामचे रिपोर्टही नॉर्मल आले आहेत. याबाबत सहाय्यक प्राध्यापिका वैद्य दिव्या कजारिया सांगतात की, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद हृदयविकाराच्या रुग्णांवर आयुर्वेद आणि ॲलोपॅथीच्या उपचारांचा अभ्यास करत आहे. यामध्ये 100% ब्लॉकेज असलेल्या हृदयविकाराच्या रुग्णालाही आयुर्वेदिक उपचाराचा फायदा झाला आहे, त्याचे अहवालही लवकरच शेअर केले जातील.
(टीप: लेखात नमूद उपचाराची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. कोणतेही उपचार घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या)