कोविड-19 ची लस घेतल्यानंतर प्लाझ्मा दान करता येईल? Plasma Donation पूर्वी जाणून घ्या 'या' महत्त्वपूर्ण बाबी
Representational Image (Photo Credits: Pixabay)

देशात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मृतांचा आकडाही चिंताजनक आहे. या परिस्थितीत, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन यांसह इतर आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान, कोरोनामुक्त झालेल्यांना प्लाझ्मा दान (Plasma Donation) करण्याचेही आवाहन करण्यात येत आहे. परंतु, त्याबद्दल काही शंका, प्रश्न अद्याप अनेकांच्या मनांत आहेत. त्याचबरोबर कोविड-19 ची लस घेतल्यानंतर प्लाझ्मा दान करता येईल का? हा अगदी सर्वांनाच पडणारा प्रश्न. तर आज या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया... प्लाझ्मा दान करण्यापूर्वी 'या' महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.

प्लाझ्मा थेरपी काय आहे?

प्लाझ्मा थेरपी ही एक मेडिकल प्रक्रीया आहे. यात कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील अॅंटीबॉडीजचा वापर संसर्ग झालेल्या व्यक्तीला बरे करण्यासाठी केला जातो. प्लाझ्मा मधील अँटीबॉडीज कोरोना विषाणूंशी लढण्यास मदत करतात आणि त्यामुळे लवकरात लवकर कोरोनामुक्त होण्यास मदत होते.  (Plasma Premier League: प्लाझ्मा डोनेशनला प्रोत्साहन देण्यासाठी पुणे येथील वंदे मातरम संघटनेचा अभिनव उपक्रम)

कोविड-19 लस घेतल्यानंतर प्लाझ्मा दान करता येईल?

कोविड-19 लस घेतल्यानंतर कमीत कमी 28 दिवसांपर्यंत तरी प्लाझ्मा दान करता येणार नाही.

MyGovIndia Tweet:

प्लाझ्मा डोनेशन: काय कराल, काय टाळाल?

# कोविड-19 संसर्गातून बरे झालेल्या व्यक्तींना प्लाझ्मा दान करता येईल. मात्र ते 18-60 या वयोगटातील असणे आवश्यक आहे.

# कोविड-19 ची लागण झाली असून asymptomatic असाल तर 14 दिवसांनी प्लाझ्मा दान करता येईल किंवा symptomatic असून कोरोनाची लक्षणे निघून गेल्यावर 14 दिवसांनी प्लाझ्मा दान करता येईल.

# तुमच्या कोविड चाचणीचा नेगेटीव्ही रिपोर्ट आणि आधार कार्ड सोबत बाळगणे गरजेचे आहे. तसंच चाचणी अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर 4 महिन्यांपर्यंत प्लाझ्मा दान करता येईल.

# प्रेन्गेंट महिला प्लाझ्मा दान करु शकणार नाहीत.

# रक्तात अँटीबॉडीजची कमतरता असताना प्लाझ्मा दान करता येणार नाही.

# त्याचबरोबर प्लाझ्मा दान करण्यापूर्वी हॉस्पिटलमधील अधिकाऱ्यांचा सल्ला किंवा त्यांच्याकडून आवश्यक माहिती घेणे योग्य ठरेल.

प्लाझ्मा दान करण्यास इच्छुक असलेल्यांनी या महत्त्वूपर्ण बाबी ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. काही कोविड-19 रुग्णांमध्ये प्लाझ्मा थेरपी अत्यंत उपयुक्त ठरली आहे. प्लाझ्मा थेरपीचा वापर रुग्णांना बरे करण्यासाठी कितपत प्रभावी ठरेल, यावर तज्ञ संशोधन करणार आहेत.