मधुमेह(Diabetes) कर्करोग, टीबी, बीपी, हृदयरोगाने ग्रस्त अशा रुग्णांमध्ये कोरोना व्हायरसचा(Coronavirus) धोका जास्त आढळत आहे उन्हाळा आणि हिवाळा नंतर बदलत्या हंगामानंतर दम्याचा आणि श्वसनाच्या रूग्णांवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत त्यांना अधिक जागरूक राहावे लागत आहे.परंतु कोरोनापासून बचाव करण्याच्या नियमांचे पालन करून, दमापासून मुक्त होण्यासाठी उंटाचे दूध अत्यंत फायदेशीर ठरत आहे.केवळ दमाच नाही तर शास्त्रज्ञांना असेही आढळले आहे की उंटांचे दूध मधुमेह आणि अगदी मतिमंद मुलांना बरे करण्यास देखील उपयुक्त आहे. वैज्ञानिकांनी त्याचे संशोधनही केले आहे. (Benefits of Olive Oil: मधुमेह, उच्च रक्तदाब नियंत्रणात ते तुमचं सौंदर्य खुलवण्यासाठी ऑलिव ऑइल उपयुक्त; इथे पहा त्याचे 6 आरोग्यदायी फायदे)
उंटाचे दुधामुळे अनेक आजार दूर होतात उंटिणीचे दूध कर्करोग,मूत्रपिंड यासह अनेक आजारांची तीव्रता कमी करण्यास उपयुक्त आहे,ऑटिझमची लक्षणे कमी करते, सूक्ष्मजंतूंचा संसर्ग कमी करतात,आतड्यांसंबंधी समस्या दूर करतात.एलर्जी पासून मुक्त करते,स्वयंप्रतिकार रोगांपासून मुक्त करते. उंटिणीच्या दुधात आढळणारे पौष्टिक पदार्थ जस्त, मॅंगनीज, मॅग्नेशियम, लोह, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम या व्यतिरिक्त अनेक जीवनसत्त्वे आहेत. ज्यात ए, बी, सी, डी आणि व्हिटॅमिन ई आहेत.लॉकडाऊनमध्ये ऊंटणीचे दूध तेव्हा चर्चेत आले जेव्हा ऑटिज्म आणि एका खाण्याच्या एलर्जी मुळे त्रास होणाऱ्या साडे तीन वर्षाच्या मुलाच्या आईने ऊंटणीचे दूध मिळावे यासाठी मदत मागितली होती.त्यानंतर यानंतर ओरिसाचे आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांनी त्या महिलेशी संपर्क साधला आणि मुंबईत राहणा महिलेला ऊंटणीचे दूध पाठवले.असे नाहीये की देशात उंटिणीच्या दुधाची कमतरता आहे, परंतु लोकांना त्याबद्दल जास्त माहिती नाही आणि कुठे ही उंटिणीच्यादुधाचे केंद्र नाही किंवा सरकारने प्रोत्साहन म्हणून एक प्लांटही लावला नाही.
राष्ट्रीय ऊंट संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एनव्ही पाटील, राष्ट्रीय उंट संशोधन संस्था (एनआरसीसी) चे माजी संचालक डॉ. एन.व्ही. पाटील यांचे याकडे लक्ष वेधण्याची इच्छा आहे.ते म्हणतात की, आताची परिस्थिति बघता उंट फक्त प्राणीसंग्रहलयातच पहायला मिळतील. कागदावर बरीच धोरणे तयार केली जातात पण जमिनीवर कोणतेही काम दिसत नाही.एका नामांकित दूध कंपनीने उंटिणीच्या दुधातून चॉकलेट बनवून पंतप्रधानांच्या हस्ते त्याचा शुभारंभ पण केला पण त्यानंतरते काम थांबले.राजस्थानमध्ये एक राज्य प्राणी जाहीर करण्यात आला होता,परंतु अद्याप त्याच्या दुधाच्या बाजाराबाबत सरकारने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यांनी सांगितले की एकट्या राजस्थानात सुमारे चार लाख लिटर उंटिणीचे दुधाचे उत्पादन केले जाते, परंतु आद्यप त्याची किंमत ना सरकारला समजली आहे ना शेतकऱ्यांना.(विमान प्रवासात कोविड-19 संसर्गाचा धोका किती? जाणून घ्या, WHO चे मत)
जैसलमेर जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे जिथे संस्था दररोज 200 ते 300 लिटर दुधाची विक्री होते .बाहेरून काही दूध कंपन्याही येथून दूध घेतात. परंतु उर्वरित जिल्ह्यांत उंटणीच्या दुधावर कोणतेही काम झाले नाही.आता राज्यात उंटांची संख्या सुमारे अडीच लाख आहे, त्यातील 50 टक्के उंटणी आहेत.हेच कारण आहे की उंटांचे दूध मोठ्या प्रमाणात वापरली जात नाही.