विमान प्रवासात कोविड-19 संसर्गाचा धोका किती? जाणून घ्या, WHO चे मत
Flight | Representational Image (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला लॉकडाऊन हळूहळू शिथिल होत आहे. अनलॉकिंग अंतर्गत बंद असलेल्या सेवा टप्प्याटप्प्याने सुविधा सुरु झाल्या आहेत. विमानसेवाही सुरु करण्यात आली आहे. मात्र विमान प्रवासात कोविड-19 (Covid-19) चा संसर्ग होण्याची शक्यता किती आहे? अशा कोणत्या बाबी आहे ज्यामुळे विमान प्रवासात कोरोनाचा धोका कायम आहे? यावर जागतिक आरोग्य संघटनेचे काय मत आहे? जाणून घेऊया. (Remdesivir Effect: कोविड-19 रुग्णांवर रेमडेसिवीर औषधाचा अत्यल्प परिणाम- WHO)

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (World Health Organisation) विमान प्रवासात कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याची धोका अत्यंत कमी आहे. विमानात कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ शकतो पण संसर्ग होण्याचा धोका अत्यंत कमी आहे. आतापर्यंत विमान प्रवाशांचे प्रमाणाच्या तुलनेत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या फारच कमी आहे. Southwest Airlines आणि United Airlines नुसार, विमानात कोरोना संसर्गाचा धोका अत्यंत अल्प असल्याचे दिसून आले. आतापर्यंत 1.2 बिलियन उड्डाणांमध्ये केवळ 44 कोरोना संसर्गाच्या घटनांची नोंद झाल्याचे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संघटनेने 8 ऑक्टोबर रोजी सांगितले होते. याचा अर्थ 2.5 कोटी प्रवाशांमागे एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असा अंदाज आहे. युएस मधील कोरोना संसर्गाचा अभ्यास करणारे Dr David Freedman यांनी ही आकडेवारी चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

WHO च्या आदेशानुसार, आजारी असलेल्या व्यक्तींना किंवा कोविडचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना विमानप्रवास करण्यास मनाई आहे. नवीन एअरक्रॉफ्ट मधील व्हेंटिलेशन सिस्टम जर्म्स आणि व्हायरर्सेंना त्वरीत फिल्टर करु शकते, असे जागितक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.