डेंग्यूची समस्या असल्यास लोक पपईच्या पानांचे सेवन करतात. डेंग्यूच्या उपचारात पपईच्या पानांचा रस तयार केलेला काढा किंवा रस पिल्याने रुग्णाला आराम मिळतो, परंतु पपईच्या पानांचे फायदे (Papaya Leaf Benefits) आणखीही बरेच आहेत. ज्यासाठी आपण पपईच्या पांनाचे सेवन केलेच पाहिजे.पपईचे असंख्य आरोग्यासाठी फायदे आहेत, परंतु त्याच्या पानांमध्येही वेगवेगळे उपचारात्मक आणि औषधी गुणधर्म आहेत. डेंग्यूच्या वेळी पपईच्या पानांची मागणी वाढते, परंतु हे पान बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून देखील प्रतिबंध करते. पोट निरोगी ठेवते. पपईच्या पानांच्या इतर फायद्यांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. (Benefits of Drumsticks: शेवग्याच्या शेंगेमध्ये आहेत औषधी गुण; प्रतिकार शक्ति वाढवण्याबरोबरच ,संधिवातामध्ये ही आहे फायदेशीर)
मधुमेह नियंत्रित करते
मधुमेह ग्रस्त लोक रक्तातील साखर कमी करण्यासाठी पपईच्या पानांचा रस नियमित आहारात घेऊ शकतात. मधुमेह असलेले लोक रक्तातील साखर पातळी कमी करण्यासाठी पपईच्या पानांचा रस पितात. जे मधुमेहावरील औषध घेत आहेत आहेत त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पपईच्या पानांचा रस घेऊ नये.
ब्लड प्लेटलेट्स संख्या वाढवतात
डेंग्यू झालेल्या लोकांमध्ये, रक्त प्लेटलेटची संख्या हळूहळू कमी होते. हे वाढविण्यासाठी लोक पपईच्या पानांचा रस रुग्णाला देतात, जेणेकरुन रक्त प्लेटलेटची संख्या वाढेल. पपईच्या पानांचा रस पिल्याने प्लेटलेट आणि आरबीसीची संख्या वाढते हे बर्याच अभ्यासांमध्ये सिद्ध झाले आहे. याने रक्त परिसंचरण सुधारते.
कर्करोग होण्यापासून बचाव
पपईच्या पानाच्या रसात अँटी-ट्यूमर गुणधर्म असतात, जे विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाच्या प्रारंभास विलंब करण्यास मदत करते. पपईच्या पानांमध्ये अँटीकेन्सर गुण असतात जे रोग प्रतिकारशक्ती वाढवितात आणि गर्भाशय ग्रीवा, स्तनाचा कर्करोग अशा कर्करोगाच्या पेशी तयार होण्यास प्रतिबंध करतात.
रोग प्रतिकारशक्ती बूस्ट करते
अभ्यासानुसार पपईच्या पानांच्या रसात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स असतात. त्याचा रस पिल्याने ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो आणि मूत्रपिंड, यकृत आणि पोट निरोगी राहते.
बद्धकोष्ठता दूर करते
पपईला रेचक म्हणून ओळखले जाते, जे आतड्यांच्या हालचाली सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यात मदत करते. त्याच्या पानांचा रस पिल्याने पोटातील त्रास टाळण्यासही मदत होते.
(टीप- या लेखात दिलेल्या सर्व माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आम्ही याचा दावा करीत नाही की, लेखात दिलेली माहिती तुमच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरेल. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांशी सल्लामसलत करा)