आंबा खाताना 'या' गोष्टींच्या घ्या काळजी अन्यथा शरीरावर होतील दुष्परिणाम
Mango (Photo Credits: Wikimedia Commons)

उन्हाळा सुरु झाला की फळांचा राजा 'आंबा' (Mango) बाजारात येण्यास सुरुवात होते त्यामुळे हा ऋतू आंबाप्रेमींसाठी पर्वणीच असतो. आंबा प्रेमी मनसोक्त आंब्यावर तुटून पडतात. मे महिना हा आंब्याचा सीझन असल्यामुळे किती आंबे खाऊ आणि किती नको असे आंबा प्रेमींना होते. वर्षातून एकदा येणा-या हा रसाळ फळाची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे हा आंबा खाताना कशाचीही पर्वा न करता यावर तुटून पडतात. पण तुम्हाला माहित आहे का अशा पद्धतीने आंबा खाल्ल्यास तुमच्या शरीरावर त्याचा विपरित परिणाम देखील होऊ शकतो. त्यामुळे तो खाताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

आंबा खाताना काही गोष्टी नियंत्रणात ठेवल्या तर त्याचा शरीरावर विपरित परिणाम होणार नाही. त्याचबरोबर काही गोष्टी ध्यानात ठेवल्या तर तुम्हीही मनमुरादपणे आंब्यावर ताव मारू शकता.

आंबा खाताना 'या' गोष्टींच्या घ्या काळजी:

1. आंबा खाण्यापूर्वी तो किमान अर्धा तास आधी थंड पाण्यात भिजत ठेवावा ज्यामुळे त्यातील उष्णता कमी होते आणि तो पचन्यास जड जात नाही. सालीसकट आंबा खाणेही शरीरासाठी चांगले असते.

2. आंबा कापण्यापूर्वी त्याला कुठे बारीक छिद्र आहे की नाही ते तपासावे. तसे असल्यास समजावे की आंब्याला किड लागली आहे आणि तो खाण्यायोग्य नाही. आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टींना द्यावे प्राधान्य? वाचा सविस्तर

3. जेवणाआधी अथवा नंतर आंबा खाणे शक्यतो टाळा. यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.

4. आंब्याला छान वास येत नसेल तर समजावा तो रासायनिकरित्या पिकवलेला आंबा आहे जो खाण्यायोग्य नाही.

5. आंब्यावर सुरकुत्या आल्या असतील तर समजावा तो आंबा नैसर्गिकरित्या पिकवलेला आहे आणि खाण्यास योग्य आहे.

कोणतेही सीजनल फळे त्या त्या सीझनमध्ये खाल्ली तर त्याचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे मधुमेह असणारेही उन्हाळ्यात आंबे खाऊ शकतात. पण त्याचे प्रमाण नियंत्रणात असावे आणि याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)