उन्हाळ्यात तशी अनेक फळे मिळतात. मात्र वर्षभर खवय्ये ज्या फळाची वाट पाहतात तो फळांचा राजा 'आंबा' (Mango) एव्हाना बाजारात यायला सुरुवात झाली असेल. दरवर्षी प्रमाणे यंदाही बाजारात मोठ्या प्रमाणावर आंबा आलाय. मात्र कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन मुळे आंब्यापर्यंत ग्राहक पोहोचणे अवघड झालय. त्यामुळे आंबा प्रेमींची निराशा होऊ नये ऑनलाईन पद्धतीने घरपोच डिलिव्हरी सुरु झाली आहे. मात्र हा आंबा (Alphonso Mango) खरेदी करताना काही विशेष गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते.
वर्षभरातील या सीझनमध्येच मिळणारे हे पौष्टिक फळासाठी खवय्ये हवे तितके पैसे मोजायला तयार असतात. त्यामुळे अशा लोकांचे नुकसान होऊ नये म्हणून आंबा विकत घेताना पुढील गोष्टींना प्राधान्य देणे गरजेचे आहे. Coronavirus चा आंबा निर्यातीलाही फटका बसण्याची शक्यता
1. उबदार
आंबा विकत घेताना तो हातात घेतला की तो उबदार लागतो की नाही ते पाहावे.
2. वजन
आंबा घेताना तो वजनदार लागला पाहिजे. रासायनिक प्रक्रिया केलेला आंबा वजानाने हलका असतो.
3. देठ
देठाचा थोडा भाग असलेला आंबा खरेदी करावा. तसेच त्या देठावर पांढरी बुरशी दिसली किंवा छिद्र दिसली तर तो आंबा विकत घेऊ नये. Akshaya Tritiya 2019: अक्षय्य तृतीया साठी बनवून पाहा आंब्याच्या या पाच हटके पाककृती
4. आकार
नाकावर आपटलेला आणि गोलाकार आंबा विकत करु नये.
5. वास
नैसर्गिक रित्या पिकवलेल्या आंब्याला छान सुगंध येतो तसेच तो छान केसरी रंगाचा दिसतो. त्यामुळे विकत घेताना आंब्याचा रंग आणि वास या दोन्ही गोष्टींना प्राधान्य द्यावे.
6. आंब्यावर छिद्र आणि काळे डाग
जास्त डागळलेला आंबा विकत घेऊ नये. तसेच त्यावर छोटे काळे छिद्र असल्यास त्याला किड लागली आहे असे समजावे. असे आंबे विकत घेऊ नये.
आंबा विकत घेताना या गोष्टींचा विचार केल्यास तुमची फसवणूक होणार नाही आणि खराब आंबा मिळाला म्हणून तुमचा हिरमोडही होणार नाही. त्यामुळे या गोष्टींची काळजी आणि मनसोक्त आंब्यावर ताव मारा.