Why Drumsticks So Expensive in Maharashtra? भारतीय पाककृतींमधील मुख्य घटक असलेली शेवगा शेंग (Drumstick Price Surge) प्रचंड महाग झाली आहे. या फळभाजीच्या किमती संपूर्ण महाराष्ट्रात विक्रमी उच्चांकावर (Drumstick Prices in Maharashtra) पोहोचल्या आहेत. किरकोळ दर प्रति किलोग्रॅम 600 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशसारख्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पुरवठा कमी झाल्यामुळे लागवडीचे आणि कापणीचे चक्र विस्कळीत झाल्यामुळे किंमतीत ही वाढ झाली असल्याचे बाजारात (Maharashtra Vegetable Market) सांगितले जात आहे. सर्वसाधारणपणे प्रति किलो 100 रुपये ते 200 रुपये इतक्या माफक दराने विकल्या जाणाऱ्या शेवगा शेंगेची किंमत आता घाऊक बाजारात 3,500 हजार रुपये ते 4,000 हजार रुपये प्रति 10 किलोग्रॅम आहे. मुंबई, पुणे आणि ठाणे यासारख्या शहरांमध्ये सर्वात जास्त वाढ होत असून पुरवठा सामान्य पातळीपेक्षा लक्षणीय खाली आहे.
बाजारातील टंचाई आणि किमतीतील वाढ
नवी मुंबईतील कृषी उत्पादन बाजार समितीने (APMC) माहिती देताना म्हटले आहे की, शेवगा शेंग आवक तीव्र प्रमाणात घटली आहे. घाऊक पुरवठा दररोज नेहमीच्या 4-5 टन वरून फक्त 700-800 किलोग्रॅमपर्यंत खाली आला आहे. परिणामी, घाऊक दर 350-400 रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत वाढले आहेत, ज्यामुळे किरकोळ दर 500-600 रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत पोहोचले आहेत. (हेही वाचा, पावसाळ्यात बाजारात येणारी शेवग्याची शेंग तुमच्या जीवनात घडवेल जादू, वाचा या भाजीचे दहा भन्नाट फायदे)
प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात घट
पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सामान्यतः तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि आसपासच्या प्रदेशांमधून शेवग्याच्या शेंगा मिळतात. तथापि, प्रतिकूल हवामानामुळे इतर राज्यांमधील उत्पादनात घट आल्याने गुजरात हा आता गुजरातच्या शेंगांचा प्राथमिक पुरवठादार आहे. वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील मर्यादित पुरवठा देखील अपुरा आहे.
हिवाळा सुरू होताच घरे आणि उपाहारगृहांमध्ये शेवग्याच्या शेंगेची मागणी वाढली आहे. ज्यामुळे किंमती आणखी वाढल्या आहेत. पुण्यातील बाजारपेठेत शेंगा नगावरही विकल्या जाऊ लागल्या आहेत. ज्या प्रत्येकी 30 ते 60 रुपयांना मिळत आहेत. ज्यामुळे अनेक ग्राहकांना पर्यायी भाज्या शोधणे भाग पडले आहे. एका भाजीपाला व्यापाऱ्याने सांगितले की, शेवग्याच्या शेंगेस हिवाळ्यात अधिक मागणी असते.परंतु त्यांच्या उच्च किंमतींनी ग्राहकांना परवडत नाहीत. परिणामी त्यांना इतर पर्यायांचा विचार करावा लागत आहे. दरम्यान, असे असले तरी, स्थानिक आणि ग्रामिण भागातून पुढील 15-20 दिवसात पुरवठा वाढण्याची व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे, ज्यामुळे किंमती स्थिर होण्यास मदत होईल.