World No Tobacco Day 2020: 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' निमित्त जाणून घ्या तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी 'हे' घरगुती उपाय
31 मे हा दिवस 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्यासाठी तसेच तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या जीवघेण्या परिणामांची माहिती देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्याने अनेकांचा बळी जातो. दरवर्षी जवळपास 60 लाख लोकांचा तंबाखूच्या सेवनामुळे मृत्यू होतो. तसेच तब्बल 9 लाख लोकांचा स्मोकिंगमुळे मृत्यू होतो.
World No Tobacco Day 2020: 31 मे हा दिवस 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' (World No Tobacco Day) म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्यासाठी तसेच तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या जीवघेण्या परिणामांची माहिती देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्याने अनेकांचा बळी जातो. दरवर्षी जवळपास 60 लाख लोकांचा तंबाखूच्या सेवनामुळे मृत्यू होतो. तसेच तब्बल 9 लाख लोकांचा स्मोकिंगमुळे मृत्यू होतो.
पूर्वी तंबाखूचं सेवन 'आरोग्यदायी' मानलं जायचं. तंबाखूच्या झाडाला सोळाव्या शतकात 'The Holy Herb' म्हणजे पवित्र औषधी वनस्पती किंवा 'God's Remedy' देवाचं औषध म्हटलं जायचं. परंतु, हळूहळू या औषधी वनस्पतीचे व्यसनात रुपातंर झाले. आज आपण 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' निमित्त तंबाखूचे व्यसन सोडण्याचे काही घरगुती उपाय जाणून घ्या घेऊयात. (हेही वाचा - Summer Health Tips: उन्हाळ्याच्या दिवसात कैरीचे पन्हे पिण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या पन्हे बनविण्याची योग्य पद्धत)
तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी घरगुती उपाय -
- उकडलेले सफरचंद दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन केल्याने दारूची सवय सुटते.
- सफरचंदाचा रस वेळोवेळी पिल्याने तसेच जेवनात सेफचा उपयोग केल्याने दारू पिण्याची सवय कमी होते.
- सिगारेट आणि तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी हळदीचे बारीक-बारीक तुकडे करावे आणि जेव्हा सिगारेट किंवा तंबाखू खाण्याची इच्छा होईल तेव्हा हळदीचे तुकडे तोंडात टाकून चघळावे. असे केल्याने काही दिवसात विडी, सिगारेट व तंबाखूची सवय सुटण्यास मदत होते.
- याशिवाय सिगारेट चे व्यसन सोडण्यासाठी दालचीनी बारीक वाटून ती मधात टाकावी. हे मिश्रण जेव्हा सिगारेट ओढण्याची इच्छा होईल तेव्हा बोटाने चाखावे.
- तंबाखूचं व्यसन सोडण्यासाठी 25 ग्रॅम कांद्याचा रस दिवसातून एकदा नियमित सेवन करावा.
- एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये लींबू पिळावे. हे मिश्रण दिवसातून अनेक वेळा घेतल्याने दारूचे व्यसन सुटते.
आपल्या आजूबाजूला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे अनेक लोक आहेत. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारी व धुम्रपान करणारी मंडळी आपण नेहमी पाहतो. तंबाखूमुळे हृदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफ्फुसाचे आजार, टि.बी. यासारख्या प्राणघातक आजार होतात. त्यामुळे या व्यसनापासून दूर राहणं गरजेचं आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 31, 2020 09:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

